म्हैसाळ योजनेतील शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे :- आ.समाधान आवताडे - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, February 3, 2024

म्हैसाळ योजनेतील शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे :- आ.समाधान आवताडे

मंगळवेढा/ प्रतिनिधी
म्हैसाळ योजनेतील सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसात करून सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी पंधरा दिवसात सोडवा शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मुबलक पाणी मिळाले पाहिजे ,दुष्काळी तालुका म्हणून पिढ्यानपिढ्या तालुक्याची होणारी अवहेलना पुसून काढण्याची भीष्मप्रतिज्ञा मी केली आहे अडीच वर्षात मी जेवढा निधी आणला तेवढा निधी आजपर्यंत कधीही आला नाही एवढा निधी आणूनही हवा तेवढा विकास अजून झाला नाही हेही मला मान्य आहे मागील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजून खूप कष्ट घ्यावे लागणार असून मी मतदारसंघाचे नंदनवन करण्याची शपथ घेतली आहे.टेंभु योजनेचं पाणी मी पहिल्यांदा मान नदीत आणलं, तालुक्याचा दक्षिण भाग दुष्काळाच्या झळा सोसतोय यावरही कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येईल असे आ समाधान आवताडे यांनी सलगर येथे बोलताना सांगितले.ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकारी व शेतकरी यांच्यात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.
भैरवनाथ शुगरचे उपाद्यक्ष अनिल सावंत,शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत सर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र जाधव,दामाजी शुगरचे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र सुरवसे,सुधाकर मासाळ,सुरेश भाकरे,दामाजीचे संचालक गौडाप्पा बिराजदार पोलीस निरीक्षक रणजित माने तसेच सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार आदी उपस्थित होते.यावेळी म्हैसाळ योजनेतील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या 19 गावातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थिती लावली यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतील त्रुटीबाबत तक्रारी केल्या यामध्ये सलगर खुर्द येथे वितरिकेचे काम अपूर्ण असल्याने पाणी मिळत नाही ठेकेदार थातुरमातुर उत्तरे देतात अधिकारी दुर्लक्ष करतात ,येळगी गावाला ट्राय बेसवरही पाणी मिळाले नाही,शिवनगी येथे कर्मचारी कुणाचेही ऐकत नाहीत वाढीव पाइपलाइन करणे गरजेचे आहे सलगर (बु) येथे पाणी एकदम कमी मिळते,पडळकरवाडी ओढ्याला पाणी सोडा तलावा शेजारून वितरीका गेली मात्र तलावात पाणी सोडत नाही,ठेकेदार अरेरावीची भाषा वापरतात,लोणार येथे 70 टक्के गावाला पाणी मिळत नाही गावातील बंधारे भरण्याच्या सूचना द्या,बावची गावाला पाणी मिळत नाही काम अपूर्ण आहे, हुन्नूर गावचे सहाशे हेक्टर क्षेत्र योजनेत असून एक बंधारा ही नीट भरून दिला जात नाही पाणी अपुरे मिळतेय,महमदाबाद गावमध्ये नऊ बंधारे आहेत पाणी कमी मिळते ,चिक्कलगी येथेही बंधाऱ्यात पाणी सोडले जात नाही,अधिकारी पैसे मागतात अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी केल्या त्याचबरोबर पाण्याच्या येणाऱ्या दोन आवर्तनातील अंतर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली अशा अनेक तक्रारी व मागण्या शेतकऱ्यांनी केल्यानंतर आमदार अवताडे यांनी त्या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन समोरासमोर अधिकाऱ्यांकडून त्या तक्रारींची उत्तरे जाणून घेतली त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार अवताडे म्हणाले की गावोगावच्या नागरिकांनीही पाणी घेताना सर्वांनी समजुतीने पाणी वाटून घेतले पाहिजे कॅनॉल फोडणे,मधूनच पाणी वळवून घेणे हे प्रकार कुणी करू नये त्याचबरोबर जर कुणी जाणूनबुजून असे प्रकार करत असेल तर अधिकाऱ्यांनीही कायदेशीर पद्धतीने त्याला अटकाव करावा जर कोणी अधिकारी पैसे मागत असेल तर लिखित तक्रार द्या चुकीचं
वागणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याची मी गय करणार नाही पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सुटल्या पाहिजेत,अपुरी कामे लवकर पूर्ण करा अशा सूचना योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना दिले आहेत.यावेळी उपकार्यकारी अधिकारी स्वप्नील गोसावी,अजिंक्य जाधव,शाखा अभियंता महेश पाटील,शिवाजी पटाप,मंगेश शिंदे,तानाजी पवार, हणमंत आसबे, सदाशिव केंगार, तानाजी जाधव,विठ्ठल सलगर रावसाहेब कांबळे, सचिन सावंत,शांतप्पा बिराजदार, किसन पाटील,रावसो पडोळकर,राजु बिराजदार,महावीर बंडगर, गुलाब थोरबोले राजू गाडवे जगन्नाथ रेवे आदी मान्यवर उपस्थित होते.या योजनेतील 19 गावांमधील ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी भरण्यासाठी या योजनेमधून तरतूद करा अशी सूचना शेतकऱ्यांमधून आल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा विहिरीपासून वितरकेपर्यंत कोणत्या गावात काय करावे लागते याची माहिती घेऊन तात्काळ प्रस्ताव तयार करा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या 

Pages