धक्कादायक:-रस्ता क्रॉस करणार्‍या मोटर सायकलस्वारास कारगाडीने जोराची धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 19, 2023

धक्कादायक:-रस्ता क्रॉस करणार्‍या मोटर सायकलस्वारास कारगाडीने जोराची धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार.....

कारचालक फरार,अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा-सांगोला महामार्गावरील शेलेवाडी चौकात रस्ता क्रॉस करणार्‍या मोटर सायकलवरील पती-पत्नीस भरधाव वेगाने येणार्‍या वेगनॉर कारने जोराची धडक देवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेची हकिकत अशी,दि.18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान एम एच 06,सी.बी.6735 या शाईन मोटर सायकलवरून यातील मयत विजय मारूती जाधव (वय 40) व त्यांची पत्नी कविता विजय जाधव (वय 35 रा.वाकणवाडी जि.रायगड सध्या शेलेवाडी) मंगळवेढयाहून बाजार करून शेलेवाडीकडे परतत असताना शेलेवाडी चौक क्रॉस करतेवेळी सांगोल्याकडून येणारी वेगनॉर कार क्र.के.ए.28 एम ए.2351 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून त्या मोटर सायकलस्वारास जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करून दोघाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची फिर्याद अजय गोपीनाथ जाधव (वय 19) याने दिल्यावर अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातग्रस्त मयत कुटुंबीय हे मूळचे रायगड जिल्हयातील असून उपजिविका करण्यासाठी बावची ता.मंगळवेढा येथे लाकडापासून कोळसे पाडण्याचे काम करीत आहेत.अपघातानंतर अज्ञात चालक फरार झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त कारगाडी जप्त करून पोलिस स्टेशन आवारात आणून लावली आहे.

Pages