एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची डॉ.प्रणिता भालके यांनी घेतली भेट... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, December 11, 2023

एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची डॉ.प्रणिता भालके यांनी घेतली भेट...

मंगळवेढा/प्रतिनिधी.
मंगळवेढा तालुक्यातील खुपंसगी पटेल-वस्ती येथील एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या पटेल वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या नातेवाईकांची डॉ.प्रणिता भगिरथ भालके यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केले.
गत आठवड्यामध्ये शाळेच्या परिसरात असलेल्या एरंड्याच्या बिया खाल्ल्याने शाळेतील जवळपास 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी आंधळगाव व मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामधील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचार करून बरी करण्यात आली होती. तर उर्वरित 14 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज डॉ. प्रणिता भगिरथ भालके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबत पाहणी करून विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांचे नातेवाईक आई-वडिलांकडे व शिक्षकाकडे देखील भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खुपसंगी गावचे सरपंच श्री.खुशाबा पडवळे उपसरपंच,प्रकाश भोसले,शहाजान पटेल,सिद्धेश्वर रुपनर,दत्ता मरिआईवाले,नानासाहेब हेगडे,रामचंद्र तांबे,इंतास पटेल,संजय घोटाळे,भाऊ तांबे,लहू लवटे,बिटु माळी,दादा भोसले,ज्ञानेश्वर हाके,तोफिक पटेल ,रोहन पडवळे,दादा लोहार,आकाश माळी,आकाश पडवळे,आजान पटेल,महादेव वाले,पिंटू माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Pages