मनोज जरांगे-पाटील यांची 5 ऑक्टोंबर रोजी मंगळवेढा येथे जाहीर सभा.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, October 2, 2023

मनोज जरांगे-पाटील यांची 5 ऑक्टोंबर रोजी मंगळवेढा येथे जाहीर सभा....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केले.
दि.१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठी जाहीर सभा होणार आहे.या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर त्यांची गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता आठवडा बाजार शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जाहीर सभा होणार आहे
तसेच ज्या समाज बांधवांकडे काही जुन्या नोंदी असतील, जुने दाखले असतील अथवा ही भूमिका बळकट करण्यासाठी काही पुरावे असतील तर त्यांनी घेऊन यावेत. हे पुरावे जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील असे आवाहन मंगळवेढा तालुका सकल मराठा समाज वतीने करण्यात येत आहे

Pages