पशुपालाक धास्तावले :- मंगळवेढासह ग्रामीण भागात लंपी आजाराने 40 गायी बाधित.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 19, 2023

पशुपालाक धास्तावले :- मंगळवेढासह ग्रामीण भागात लंपी आजाराने 40 गायी बाधित....

दिव्य न्युज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून या आजारामुळे पशुपालक धास्तावले आहेत.दरम्यान,सध्या 40 गायी लंपी आजाराने बाधित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
वातावरणातील तपमान वाढत चालल्यामुळे लंपी आजार ही वाढत चालला आहे.हा आजार जून महिन्यात कमी झाला होता.परिणामी कमी आजारामुळे पशुपालकांचा जीवही भांडयात पडला होता. मात्र पुन्हा या आजाराने जोम धरल्याने जनावराच्या अंगावर बारिक गाठी उदभवत असून पायांना सूज येत असल्याचे चित्र आहे.गावनिहाय लंपी आजारांची संख्या पुढीलप्रमाणे शेलेवाडी -2,डोंगरगांव -1,हिवरगांव-1,मारोळी -1,लक्ष्मीदहिवडी-2,नंदेश्‍वर-3,हुलजंती-2,सोड्डी-2,पाटखळ-2,बठाण-1,माचणूर-5,मुंढेवाडी-1,सिध्दापूर-3,अरळी-4,तामदर्डी-5,तांडोर-4,नंदूर-1 अशी गावनिहाय 40 बाधित गायींची संख्या आहे. दरम्यान मध्यंतरी लंपीग्रस्त 49 हजार 434 गायीं व वासरांना लसीकरण केले होते.
पशुपालकानी बाधित जनावरे बाजूला बांधावीत,त्यांची स्वच्छता राखावी,चारा व पाणी वेगळे करावे,गोचीड,गोमाशी यांचे निर्मुलन करावे. डाँ.तानाजी भोसले, पशूधन विकास अधिकारी,मंगळवेढा.

Pages