पावसाने ओढ दिल्याने जनावरांना चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, July 7, 2023

पावसाने ओढ दिल्याने जनावरांना चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार....

आ. समाधान अवताडे यांची गाव भेट दौऱ्यामध्ये माहिती... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 11 गावचा दौरा आ.समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन पूर्ण केला यामध्ये गावातील नागरिकांकडून लेखी तक्रारी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर प्रश्नांचा भडीमार करीत अनेक तक्रारींचे निरसन केले त्याचबरोबर 24 गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजना या अधिवेशनापर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती दिली. पावसाने ओढदिल्याने पशुपालकांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित करत चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी या दौऱ्यामध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार मदन जाधव गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील वन विभागाच्या अधिकारी चैत्राली वाघ जिल्हा परिषद बांधकाम चे नंदकुमार कोष्टी तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे पुरवठा विभ़ागाचे शिवाजी भाेसले यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी गाव भेट दौऱ्यात उपस्थित होते त्यातील पाठखळ गावापासून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी पाठखळमध्ये रस्ते,नवीन तलाठी कार्यालय,स्मशानभूमी साठी वनविभागाची जमीन हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या त्याच बरोबर जलजीवनचे कामे निकृष्ठ झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिली जुनोनी येथे धनदंडग्या लोकांना रेशनचा माल मिळतो पण गरिबांना धान्य मिळत नाही अशी मागणी नागरिकांनी केली.
नंदेश्वर मध्ये एस टीचे वेळापत्रक बदलणे ,तरुणांची रस्त्याने हुल्लडबाजी होत असून निर्भय पथक पाठविणे ही मागणी केली भोसे येथे पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी केली मागणी त्याचबरोबर पुरवठा विभागाचे कर्मचारी भोसले हे कार्यालयात काम घेऊन गेल्यास अपशब्द वापरतात अशी तक्रार काही नागरिकांनी केल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा असा पवित्रा आ आवताडे यांनी घेतल्याने तहसीलदार मदन जाधव यांनी त्यांचेवर कारवाईचे आश्वासन दिले. हुन्नूर येथे शिरनंदगी तलावातील गाळ काढल्यास बारमाही पाण्याची सोय होईल,तीर्थक्षेत्र बिरोबा देवस्थानला निधी द्या,त्याचबरोबर महावितरण अधिकारी खासगी ठेकेदाराला पुढे करत काम करत आहेत फ्युस सुद्धा कार्यालयाकडून देत नाहीत अशी तक्रार केली त्याचबरोबर उपकेंद्रात डॉक्टर राहत नसल्याने डॉक्टरांना आ आवताडे यांनी ग्रामस्थांसामोरच झापले.महमदाबाद हु येथे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी मांडली एकंदरीत सर्व गावांमध्ये पाणी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य न मिळणे रस्त्यांची दुरावस्था या समस्या आमदार आवताडे यांच्यासमोर नागरिकांनी मांडल्या यावेळी आमदार अवताडे यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत 11 गावचा दौरा पूर्ण केला यावेळी सोबत विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते
गावभेट दौऱ्यामध्ये दारू पिऊन बैठकीमध्ये गाेंधळ करणाऱ्यांची संख्या पाहता आ. अवताडे यांनी जुनोनी येथे गावात किती धंदे आहेत हे विचारले असता सहा धंदे उघडपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यावेळी पोलीस प्रशासन काय करतय? असा सवाल आमदार यांनी करून पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी केली त्याच बरोबर नंदेश्वर येथे पोलिसाने चोरीच्या प्रकरणात सोने कमी नोंद केल्याची तक्रार करत पोलीस रक्षक नव्हे भक्षक झाले आहेत अशा शब्दात शामु बंडगर या वृद्धांने आपली कैफियत आ आवताडे यांच्यासमोर मांडली त्यावेळी उपस्थितांच्या भूवया उंचावल्या यावेऴी आ. आवताडेंनी पोलिसांना नीट काम करण्याच्या सूचना दिल्या.

Pages