नगरपालिका हद्दीतील ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी तात्काळ बांधकाम परवाना देण्याची मागणी :- मा.नगरसेवक सतीश (भाऊ) सावंत... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, June 30, 2023

नगरपालिका हद्दीतील ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी तात्काळ बांधकाम परवाना देण्याची मागणी :- मा.नगरसेवक सतीश (भाऊ) सावंत...

सांगोला नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन..
....
सांगोला/प्रतिनिधी
सागोला नगरपालिका हद्दीतील ग्रीन झोन व यलो झोनमध्ये घरकुलासाठी तात्काळ बांधकाम परवाना देण्यात यावे अशी मागणी मा.नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांनी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांना यांचेकडे केले आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
सांगोला येथे शासनाच्यावतीने गोर-गोरीबांसाठी व ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी पतंप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधणे सुरू केली. या घरकुल योजनेमध्ये अनेकांना पैसे नसताना सुध्दा स्वतःची जागा असली तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा शासनाने प्रयत्न केला. शासनाने गोरगरींबांसाठी चालू केलेल्या या घरकुल योजनेचा लाभ शहरातील अनेक नागरिकांनी घेतला. यापुर्वी सांगोला नगरपालिकेने ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले. त्यामुळे अनेकांनी घरे बांधली व अनेकांना या घरकुल योजनेचा लाभ घेता आला. परंतू नगरपालिकेेने अचानकच ग्रीन झोन मधील घरकुलाचे बांधकाम परवाने व वापर परवाने बंद केले. त्यामुळे अनेकांची घरे बांधण्याची स्वप्ने अर्धवटच राहिली अनेकजण नगरपालिकेमध्ये ग्रीन झोन मध्ये व यलोझोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने मागण्यासाठी हेलपाटे घालतात परंतू त्यांची कसलीही दखल घेतली जात नाही. ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले तर गोर-गोरीब नागरिक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेईल. व शासनाच्या या घरकुलाची योजना वाड्यावस्त्यापर्यंत पोहचेल त्यामुळे सांगोला शहरासह वाड्यावस्त्यावरील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावेत अशी मागणी या निवदेनात केली आहे. सांगोला शहर विकास संघर्ष समितीचा जनता दरबार कायम सुरू -
सांगोला शहरासह तालुक्यातील सर्वसामान्यांचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय,कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय,तलाठी कार्यालय, संजय गांधी निराधार योजना,पंचायत समिती ,शिक्षण विभाग,आरोग्य विभाग ,ग्रामीण रुग्णालय,दुय्यम निबंधक कार्यालय ,नगरपालिका या विविध शासकीय कार्यालयात ज्या अडचणी आहेत व त्यांचे प्रश्‍न आहेत ते सांगोला शहर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून दररोज सोडवण्यासाठी अकरा ते दोन या वेळेत जनता दरबार सुरू असतो सांगोला नगरीचे मा. नगराध्यक्ष स्वर्गीय ल .वी .भाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला जनता दरबार अखंडपणे सुरू असून या जनता दरबारामध्ये तालुक्यातील अनेक नागरिकांचे प्रश्‍न सोडवले असून हा जनता दरबार कायमस्वरूपी सुरू असल्याचे सांगोला शहर विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी सांगितले.

Pages