कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अंकुश पडवळे यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल...... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, June 19, 2023

कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अंकुश पडवळे यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल......

रस्ता बंद केल्याच्या कारणावरून लाेखंडी राँडने मारून एकाची बरगडी तोडली....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील खुंपसगी येथील घटना तुम्ही भांडणे का केली? तसेच तु रस्ता कसा काय बंद करतो ? असा जाब विचारीत एका 43 वर्षीय तरूणावर लोखंडी रॉडने हल्ला करून छातीच्या बरगडया तोडल्याप्रकरणी कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अंकुश उर्फ तुकाराम पडवळे,संजय शंकर दवले,श्रीकांत सुभाष दवले,संग्राम सिताराम पडवळे,लक्ष्मीकांत दत्तात्रय दवले,इंद्रजित शंकर दवले,सुयश यशवंत चौगुले व इतर अज्ञात तीन (सर्व रा.खुपसंगी) आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बापू बाबासाहेब शेळके रा.खुपसंगी हे दि.13 जून रोजी रात्री 12.40 च्या दरम्यान मंगळवेढा येथून फिर्यादी तसेच रावसाहेब शेळके,लताबाई शेळके,दिनेश लेंगरे,विनोद बंडगर,नवनाथ बंडगर असे सर्वजण मोटर सायकलवरून खुपसंगी गावाकडे जात असताना वरील आरोपीनी फिर्यादीस व इतर लोकांना तुम्ही का भांडणे केली,तु रस्ता कसा काय बंद करतो असे म्हणून आरोपीनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पाठीत व डाव्या बाजूच्या बरगडीवर मारून गंभीर जखमी करून बरगडी फ्रॅक्चर केली. तसेच फिर्यादीस दगडाने व तलवार हातात घेवून जीवे मारण्याची धमकी देत तलवारीचा वार केला मात्र तो फिर्यादीने चुकविल्याने ते बालंबाल बचावले.यावेळी फिर्यादीचा भाऊ भांडणे सोडविण्यास आल्यानंतर त्यालाही काठीने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे हे करीत आहेत.

Pages