कत्तलखान्याकडे जाणारे जनावरांचे वाहन मंगळवेढा पोलिसांनी पकडले.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, June 19, 2023

कत्तलखान्याकडे जाणारे जनावरांचे वाहन मंगळवेढा पोलिसांनी पकडले....

चालक व वाहनमालक या दोघांविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर पिक अपमधून कत्तलखान्याकडे घेवून जाणार्‍या जनावराचा टेंपो पोलिसांनी पकडून वाहनचालक रणजित सुनिल शिंदे,मालक पप्पू भोसले रा.खुपसंगी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.17 रोजी मंगळवेढा पोलिसांना खुपसंगी येथून सोलापूर येथील कत्तलखान्याकडे जनावरे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सोलापूर रोडवरील रानवारा या हॉटेलजवळ सापळा लावला असता एम एच 13 सी.यु.8863 हा पिक अप काळे व पांढर्‍या रंगाची जनावरे दाटीवाटीने क्षमतेपेक्षा जास्त मोठी जनावरे निर्दयपणे वाहनात कोंबून त्यांना वेदना होईल अशा परिस्थितीत घेवून जात असताना पोलिसांना मिळून आला.पिकअप चालकाकडे त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने रणजित सुनिल शिंदे (वय 22 रा.आंधळगांव) तर मालकाबाबत चौकशी केली असता पप्पू भोसले (रा.खुपसंगी) अशी नावे चौकशीत निष्पन्न झाली.
यामध्ये 15 हजार रुपये किमतीची 5 लहान जनावरे,40 हजार रुपये किमतीची मोठी दोन जनावरे 3 लाख रुपयांचा पिक अप असा एकूण 3 लाख 65 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.कत्तलीसाठी घेवून जात असल्याची खात्री पोलिसांना पटल्यावर पोलिसांनी जनावरे ताब्यात घेवून सोलापूर येथील गो शाळेत जमा करणार असल्याचे सांगितले. याचा अधिक तपास पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.

Pages