मंगळवेढ्यातील प्रकार :- खाजगी रुग्णालयाकडून रुग्णाची लूट सिजर बाळंतपणासाठी केले एक लाख दहा हजार रुपयाची बिल .. - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 4, 2023

मंगळवेढ्यातील प्रकार :- खाजगी रुग्णालयाकडून रुग्णाची लूट सिजर बाळंतपणासाठी केले एक लाख दहा हजार रुपयाची बिल ..

एकीकडे अनेक वर्षानंतर झालेल्या बाळाचा आनंद तर दुसरीकडे बिलाचा आकडेवारी बघून हैरान...
बिलाची पावती फिरतेय सोशल मीडियावर....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढ्यातील काही खाजगी दवाखान्यातून रुग्णांची चक्क लूट सुरू आहे. एका खाजगी रुग्णालयाने सिजर बाळंतपण करण्यासाठी 'हाय रिस्क' चे कारण सांगत गरीब रुग्णाकडून चक्क एक लाख दहा हजार शंभर रुपये बिल केल्याची घटना घडली आहे. असून सदर बिलाची पावती सध्या सोशल मीडियातून वेगाने फिरत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट समोर येत असल्याने त्या पेशंटच्या नातेवाईकासह सर्वसामान्यांना नागरिकांतून त्या रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या तालुक्याच्या दक्षिण भागातील एका गावातून एक महिला रूग्ण बाळंतपणासाठी मंगळवेढातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेचे तेथील डॉक्टरांनी सिझर केले त्यावेळी त्या पेशंटला हाय रिस्क आहे म्हणून सांगण्यात आले सिझर व्यवस्थित झाले बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याने व त्या कुटुंबात अनेक दिवसांनी पाळणा हालल्याने ते कुटुंब आनंदात होते.परंतु त्या खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने तब्बल 1,10,100 रुपयाचे बिल रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात ठेवले.त्यावेळी मात्र नातेवाईकांना धक्काच बसला. एखाद्या महिलेचे सिझर होवून बाळंत झालेल्या महिलेचे उपचाराचे बिल एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
या बिलाची माहिती काही सजग नागरिकांना मिळताच त्यांनी सदर बिलाची पावती सोशल मीडिया व व्हाट्सअपच्या स्टेटसला ठेवून खाजगी रुग्णालयाकडून होत असलेल्या आर्थिक लुटीचा मुद्दा सध्या सोशल मिडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. या प्रकरणात नेहमीप्रमाणे संबधित पेशंट कडून रुग्णालय प्रशासनाने आपल्यावर काही बालंट येवू नये याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची देखील रुग्णालयाच्या विरोधात न बोलण्याची मानसिकता त्या रुग्णालयाच्या प्रशासनाने केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा मंगळवेढ्यात कारखानदारीच्या व समाजकारणाच्या माध्यमातून संबंध येत आहे त्यामुळं तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णांच्या आर्थिक लुटीला चाप लावावा तसेच रोजंदारी करून पोट भरणाऱ्या त्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून लुटलेल्या बिलाची रक्कम परत करन्यास मदत करावी अशी मागणी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील 35 गावातील दुष्काळी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाचा पगार घेवुन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाडणाऱ्या काही आरोग्य सेविका व सेवक यांचा या प्रकरणातील सहभाग शोधून त्यांच्यावर देखील कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयात मोफत उपचार असताना रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत असताना याबाबत आरोग्य खाते जनजागृती करत नाही का?असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. अशा लूट करणारी खाजगी दवाखान्यातील कारभाराला चाप बसवून कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य रुग्ण व नागरिकांमधून होत आहे.

Pages