मंगळवेढा तहसीलदार यांनी वरिष्ठांच्या पत्रांना दाखवली केराची टोपली :- अँड. रमेश जोशी
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील मौजे पाटकळ येथील गट नंबर २५८ मध्ये मोरे यांचे स्वतःचे खाजगी मालकीचे सिद्धनाथ मंगल कार्यालय पाठीमागील अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या चालू आहे त्याबाबत अनेक जणांनी तक्रारी दाखल केलेल्या असून या तक्रारीनंतरही नगररचना सोलापूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी मंगळवेढा तहसिल कार्यालयाचे तहसीलदार यांना कारवाईबाबत पत्र देऊन देखील मंगळवेढा तहसीलदारसाहेबांनी अद्याप दंडात्मक कारवाई/दंड आकारणे याबाबत काहीही केलेले नाही.

मंगळवेढा येथीलच रजपूत लॉन्स मंगलकार्यालयावर मात्र लाखो रुपये दंड आकारणी याच तहसीलदारसाहेबांनी केलेली आहे.मग असा संतप्त सवाल अनेक नागरिकांमधून विचारण्यात येत आहे की असा भेदभाव का केला जात आहे? रजपूत लॉन्स मंगलकार्यालयावर जी कारवाई केली तीच नियमावली दाखवून पाटकळ येथील सिद्धनाथ मंगलकार्यालयावर देखील दंडात्मक कारवाई/दंड आकारणी करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली असून यासंदर्भात तक्रारही अँड. रमेश दिनानाथ जोशी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली आहे. आता या तक्रारीनंतर तहसीलदारसाहेब काय भूमिका घेणार याकडे मंगळवेढा शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.