धक्कादायक :- पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या माचणूर येथील प्रकार..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 14, 2023

धक्कादायक :- पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या माचणूर येथील प्रकार.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील घटना पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरुपाचा वाद झाल्याने रागाच्या भरात एका ऊसतोड कामगाराने आंब्याच्या झाडाला गळफास घेवून माचणूर येथे आत्महत्या केली. विठ्ठल किसन माने (वय 26 रा.जनेवाडी ता.पाटोदा जि.बीड) असे गळफास घेणार्‍या तरुणाचे नाव असून अकस्मात अशी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे राजू अर्जुन सुरवसे (मुळ रा.जुनेवाडी जि.बीड) हे साखर कारखाना युटोपियनमध्ये ऊसतोडीचे काम करीत आहेत. माचणूर परिसरातील ब्रम्हपुरी-मुंढेवाडी रस्त्यालगत ऊसतोडणी मजूर कोप्या घालून रहावयास आहेत. यातील मयत हे खबर देणार्‍याचा भाचा असून मयत व त्यांची पत्नी यांच्यामध्ये घरातील किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात मयत विठ्ठल माने याने दि.13 रोजीच्या सकाळी 7 पुर्वी बापू दादा पाटील यांचे शेती गट नं.499 मधील बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार नवले हे करीत आहेत.

Pages