काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड...... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 3, 2023

काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड......

मंगळवेढा न्यायालयाने सुनावली पाच जनांना शिक्षा.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
जुन्या भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून एकास काठीने मारहाण करून गंभीर जखमी करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी विलास खांडेकर,रणजित खांडेकर,पंडित खांडेकर,राजेंद्र खांडेकर,सुवर्णा खांडेकर(रा. सर्व खोमनाळ) या पाच जणांना दोषी धरून मंगळवेढयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस.एन.गंगवाल-शहा यांनी सहा महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी संदिपान खांडेकर हे दि.10 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8.00 वा. घरी असताना यातील आरोपी विलास खांडेकर हा दारू पिवून येवून गोंधळ घालू लागला.त्यावेळी फिर्यादीने मोबाईलवरून फोन करून रणजित खांडेकर यास बोलावून घेतले. व तो म्हणाला, चुलते विलास खांडेकर यांचेबरोबर भांडण का केले अशी विचारणा करीत असताना वरील आरोपीने मोटर सायकलवर येवून तुला जास्त मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळी करीत शेजारी पडलेल्या लाकडाने मारहाण केली असल्याची फिर्याद पोलिसात दाखल होती. याचा तपास पोलिस हवालदार गोडसे यांनी करून सर्व आरोपींना अटक केली.व न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.यामध्ये फिर्यादी,जखमी व उपचार करणारे डॉक्टर्स यांची साक्ष महत्वाची ठरली.न्यायालयाने बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी केल्याप्रकरणी सहा महिने साधी कैद व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा हे पैसे नुकसान भरपाईपोटी जखमी फिर्यादीस देण्याचे आदेश केले असून सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत.सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले.

Pages