मंगळवेढ्याच्या मातीतला ज्वारीरूपी हिरा...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा ज्वारीची खासीयत भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेला व ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील तालुका आहे. ही भूमी संताची भुमी म्हणून ओळखली जाते व दामाजीपंतांच्या पदपरश्याने पावन झालेल्या दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा यांसारख्या संतांनी पावन झाली नगरी असून हा तालुका सोलापूरपासून सुमारे 55 किलोमीटर अंतर असून मंगळवेढा सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले शिवार हे काळे शिवार म्हणून ओळखले जाते म्हणजेच जिकडे बघेल तिकडे ज्वारीचे पीक अगदी खुशीत डोलत असते व मंगळवेढा हा कायमच्या दुष्काळी पट्ट्यातील भाग म्हणून या तालुक्याची ओळख आहे. ज्वारी हे इथले रिमझिम पावसावर येणारे पिक आहे व कोरडवाहू पीक आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर ते घेतले जाते. येथील सरासरी पर्जन्यमान 519.8 मिमी आहे.

येथील हवामान उष्ण व कोरडे असते. या भागात 50 ते 60 फूट खोली असलेली काळी सुपीक जमीन उत्पादनास मोठा वाव असल्यामुळे मंगळवेढ्याच्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असून. निसर्गाता लाभलेले पोषक हवामान यामुळे मंगळवेढ्यातील ज्वारीची चव इतर ज्वारी पेक्षा वेगळीच आहे त्यामुळेच मंगळवेढ्याच्या ज्वारीला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे त्यासाठी मालदंडी ज्वारी विकास संघ व कृषी विभाग यांनी विशेष प्रयत्न केले.
सुमारे एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या ४० ते ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जात होते परतू दर वर्षी ज्वारी खाली क्षेत्रावर घट होत असून यावर्षीचे ज्वारीचे क्षेत्र =25638 या वर्षीचे क्षेत्र साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात पेरणीची लगबग चालू असून सततच्या बदलते हवामाना मुळे ज्वारी करणारे शेतकरी उशिरा वापसा आल्या मुळे शेतकरी हरभरा पिकाकडे वळले आहेत.
परतू हलक्या जमिनीत सरासरी एकरी 4 ते 6 क्विंटल, मध्यम जमिनीत 8 ते 10 आणि भारी जमिनीत 12 ते 15 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होऊ शकते.अर्थात पाणी, हवामान व शेतकऱ्याने केलेले पीक व्यवस्थापन यावर ते अवलंबून असते. येथील ज्वारी खाण्यासाठी रुचकर स्वादिष्ट व चविष्ट असून मालदांडी नावाने प्रसिद्ध आहे. चाराही पोषक असून माल देणारी दांडी असाही अर्थ लावण्यात येतो. या ज्वारीच्या दांडीचा उपयोग दुभत्या गायींसाठी चारा म्हणूनही केला जातो. या मालदांडीमध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत. याला कडबा म्हणतात जनावरांसाठी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणी जातो व दूध उत्पादक संघाने दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांसाठी पोषक अशा या मंगळवेढा ज्वारीच्या दांड्यांनी भरलेले ट्रक मागवून घेतले जातात . त्याचा गायींच्या दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मंगळवेढा ज्वारीचे वैशिष्ट्य इथल्या मातीत येणाऱ्या ज्वारीचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे, की कमी तापमानाला ती प्रतिकारक्षम आहे. दाणा टपोरा व भाकरी चविष्ट व स्वादिष्ट गोड आणि नैसर्गिक गुणधर्म असून, त्याची व चाऱ्याची प्रत उत्तम आहे.
या ज्वारीची भाकरी चविष्ट असते. तिच्यात ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाकरी मऊ व चव गोड आहे . या ज्वारीमध्ये खोडमाशी व मावा यांसारख्या तसेच तांबेरा यांसारख्या रोगांवर मात करण्याचा उपजत गुण आहे. त्यामुळे या ज्वारीवर कीडनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नाही. ज्वारीला आयुर्वेदातदेखील खूप महत्त्व असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना या ज्वारीच्या भाकरीचा मोठा फायदा होऊ शकतो.

ज्वारी खालील क्षेत्र कमी होत असले तरी एकरी उत्पादकता वाढीसाठी विविध प्रयत्न चालू आहे उदाहरणार्थ खरीप मध्ये सोयाबीन मूग सारखी पिके घेऊन जमिनीची सुपीकता टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर उत्पादित झालेल्या ज्वारीवर प्रक्रिया करून ज्वारीपासून रवा पोहे बिस्किटे इत्यादी पदार्थ निर्मिती केल्यास ज्वारीला चांगला दर मिळणे शक्य आहे यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमधून 35 टक्के अनुदान मिळू शकते त्यासाठी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.
प्रशांत काटे
कृषी सहायक मंगळवेढा
काढणी मोडणी साठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत उपलब्ध झाल्यास मजुरीचे दर प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी इतर पिकाकडे वळू लागले आहेत परंतु आम्ही शेतकरी मंगळवेढ्याचे वैभव असलेल्या मालदांडी ज्वारीला टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
श्रीरंग राजाराम शिंदे
मंगळवेढा शेतकरी
आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने ज्वारीचे उत्पादन घेत असून दुष्काळी पट्ट्याला योग्य असे पीक म्हणजे ज्वारीच आहे ज्वारीला चांगला दर मिळाल्यास ज्वारीखालील क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकेल व पुन्हा ज्वारीचे शिवार पुर्वी सारखे डोलताना दिसू लागेल
संग्राम मनोहर धोंगडे