लोकप्रतिनिधींना पोलिस अधिकार्‍यांनी विश्‍वासात घेवून काम करावे -ना.राधाकृष्ण विखे पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 17, 2022

लोकप्रतिनिधींना पोलिस अधिकार्‍यांनी विश्‍वासात घेवून काम करावे -ना.राधाकृष्ण विखे पाटील

मंगळवेढा/प्रतिनिधी
सध्या पोलिस यंत्रणेत आधुनिकता येत असून ही कौतुकास्पद बाब आहे,सोशल मिडीवर कुठल्याही घटनेची शहनिशा न करता धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या बातम्या येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवून पोलिस यंत्रणेवर ताण येतो आहे. लोकप्रतिनिधी व पोलिस शासनाचे दोन घटक असून लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून पोलिस अधिकार्‍यांनी काम करावे,मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.कार्यालय चांगले झाले असून भविष्यात येथील पोलिस यंत्रणेने चांगले काम करावे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या नविन वास्तू उदघाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार समाधान आवताडे,आ.सुभाष देशमुख,आ.सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे,अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव,प्रांत आप्पासाो समिंदर,तहसीलदार स्वप्नील रावडे,अभिजीत पाटील,डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे म्हणाले,येथील कार्यालयाला 2008 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली,अपुर्‍या निधीमुळे या कार्यालयाचे काम लवकर पूर्ण होवू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.जिल्हा नियोजन मंडळाकडून 22.40 लाखाच्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.या कार्यालयांतर्गत मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यातील 185 गावांचा समावेश असून यामध्ये जवळपास 6 लाख लोकसंख्या आहे.ना.राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले,पोलिस यंत्रणेत आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांनी पोलिस स्टेशनला न येता ते ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात.पोलिस अधिक्षकांनी पुढाकार घेवून कामात आधुनिकता आणल्यास त्याला शासन पाठबळ देईल.तसेच क्राईमरेट कमी झाला पाहिजे.असे त्यांनी सूचित केले.
भिमा नदीमधून मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पैशाच्या जोरावर गुन्हेगारी वाढत असल्याची त्यांनी खंत व्यक्त करून त्यास अटकाव झाला पाहिजे,सध्याच्या सरकारने 22 हजार पोलिस भरतीचे नियोजन करून पोलिस प्रशासन बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे.आ.समाधान आवताडे म्हणाले,पोलिसांनी तक्रार आल्यानंतर त्याची शहनिशा करूनच गुन्हे दाखल करावेत,एकाच ठिकाणी सर्व शासकिय कार्यालये यावीत असा शासनाचा अजेंडा असून त्याप्रमाणे तहसील कार्यालय,डी.वाय.एस.पी.कार्यालय असून केवळ प्रांत कार्यालय एकत्र येणे बाकी आहे.वारी परिवाराने या परिसरात मोठी झाडे लावण्याचे काम केल्याने त्यांचे यावेळी आभार मानले.
यावेळी पोलिस निरिक्षक रणजित माने,पोलिस निरिक्षक अनंत कुलकर्णी,सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे,सत्यजीत आवटे,वाघमोडे,बापूसाो पिंगळे यांचेसह मंगळवेढा व सांगोला पोलिस स्टेशनअंतर्गत सर्व पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती बालटे यांनी तर आभार अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी मानले.
मंगळवेढयातील नुतन डी.वाय.एस.पी.कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन प्रसंगी बोलताना ना.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अन्य मान्यवर उपस्थित होते सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने या पिक पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी सर्व अधिकार्‍यांना सक्त सुचना देण्यात येतील. असे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Pages