धक्कादायक! माचणूर येथील भिमा नदी पात्रात अनोळखी स्त्रीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, November 14, 2022

धक्कादायक! माचणूर येथील भिमा नदी पात्रात अनोळखी स्त्रीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले...

मंगळवेढा/प्रतिनिधी माचणूर येथील भिमा नदीच्या पात्रात एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत मिळाले असून त्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकाचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी, दि.12 रोजी सकाळी 9.30 वाजता यातील खबर देणारे गावचे पोलिस पाटील सुहास डोके यांना भारत शिवशरण यानी फोन करून सांगितले की, राजेंद्र शिवशरण यांचे शेताजवळ भिमा नदी पात्रात एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती देण्यात आली. मंगळवेढा पोलिसांना या घटनेबाबत पोलिस पाटलांनी कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे सदर ठिकाणी हजर झाले. सदर मयताचे तोंड उघडून जीभ बाहेर आलेल्या अवस्थेत व संपूर्ण बॉडी कुजलेली असून उग्र वास येत असल्याचे तपासात दिसून आले.
सदर प्रेताच्या अंगावर काळया रंगाचा ब्लाउज, विटकरी पिवळया रंगाची साडी, लाल रंगाचा परकर असून अंदाजे 50 ते 55 वर्षाचे असावे असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.

Pages