सांगोला तालुक्याच्या पत्रकारितेत जेष्ठ पत्रकार सतीश(भाऊ)सावंत यांच्या माध्यमातून मिळाला मानाचा तुरा..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, November 6, 2022

सांगोला तालुक्याच्या पत्रकारितेत जेष्ठ पत्रकार सतीश(भाऊ)सावंत यांच्या माध्यमातून मिळाला मानाचा तुरा.....

डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सतीश (भाऊ) सावंत यांना सूर्याभारत फाउंडेशनचा सूर्याभारत राष्ट्रीय पत्रकार प्रदान...... सांगोला/प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्‍वर येथे झाले. सूर्य दत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्य दत्ता ग्रुप इन्स्टिट्यूट इंडियाचे डॉ.संजय चोरडिया व डॉ.सुषमा चोरडिया यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीशभाऊ सावंत यांना प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ पत्रकार सतीशभाऊ सावंत हे दोन दैनिकाचे संपादक आहेत व ते निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात सलग 24 वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहेत. पत्रकारितेत त्यांनी सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नावलौकिक केला आहे सक्षमपणे सतीशभाऊ सावंत यांनी दोन दैनिके चालवली असून मोठ्या प्रमाणावर पत्रकार तयार केली आहेत. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिक तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. पत्रकारितेत त्यांनी विश्‍वासहर्ता निर्माण केली असून सोशल मीडियामध्ये त्यांचे काम जलद गतीने सुरू आहे सोशल मीडिया त्यांनी प्रभावशाली बनवला आहे.मेट्रो सिटी पासून खेडेगांवापर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली. सध्या डिजिटल मीडिया मधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो वे पोर्टल, युटयुब चैनल व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना योग्य ते न्याय मिळावा व शासनाने याची दखल घ्यावी यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संयोजन समितीचे सर्व सदस्य सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष शिराळे व नितीन ढापरे यांनी सातारा कंदी पेढे देऊन सतीश भाऊ सावंत यांचा यथोचित सत्कार केला यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे डॉ. संजय चोरडिया यांच्या वतीने सतीश भाऊ सावंत यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी डिजिटल मीडियाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्‍वर येथील भिलार या गावांमध्ये घेण्यात आले होते याच पार्श्‍वभूमीवर सांगोला तालुक्याचे सुप्रसिद्ध पत्रकार व डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सतीश(भाऊ)सावंत यांना सूर्याभारत राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्कार सूर्याभारत फाउंडेशनचे सर्वेसर्वा संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या शुभहस्ते जिल्हाध्यक्ष सावंत यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे सांगोला तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये व जिल्ह्याच्या पत्रकार क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा रोवण्याचे काम सावंत यांच्या माध्यमातून झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक देखील होत आहे.

Pages