मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून 20 वर्षीय तरूणी बेपत्ता झाली असून या प्रकरणी तीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिस त्या तरूणीचा कसून शोध घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील तक्रारदार आई दि.5 रोजी जत येथे साखर पुडयाचा कार्यक्रम असल्याने तिकडे गेल्या होत्या.20 वर्षीय तरूणी घरात एकटीच होती.
दि.6 रोजी सकाळी 10.30 वा. तक्रारदाराच्या जावेने फोन करून सांगितले की, तुझी मुलगी घरी दिसत नाही. ती कुठे गेली आहे माहित नाही असे सांगितल्यावर सदर मुलीची आई तात्काळ आपल्या मुळ गावी येवून मुलीचा नातेवाईक व परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.तीचे वर्णन -रंग सावळा,उंची 5 फुट,अंगाने मध्यम,अंगात आकाशी कलरचा टॉप त्यावर पिवळी पांढरी फुले असलेली पँट,भाषा कन्नड,मराठी बोलते. अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Monday, November 7, 2022
