मंगळवेढा शहरात 10 ठिकाणी छापे टाकून 20 ब्रास अवैध वाळूसाठा केला जप्त.. - Divyaprabhat News

Breaking News

Monday, October 4, 2021

मंगळवेढा शहरात 10 ठिकाणी छापे टाकून 20 ब्रास अवैध वाळूसाठा केला जप्त..


महसूल व पोलिस प्रशासनाची धडक मोहिम..


मंगळवेढा/प्रतिनिधी 

मंगळवेढा महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी अवैध वाळूसाठयाविरूध्द कडक मोहिम सुरु केली असून मंगळवेढा शहरात ज्या बांधकामावर अवैधरित्या वाळू घेतली जात आहे त्या बांधकामावर स्वतः तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी 10 ठिकाणी  छापे टाकून जवळपास दिवसभरात 20 ब्रास वाळू जप्त करून तहसील कार्यालय आवारात साठा केला आहे.दरम्यान,या वाळू कारवाईमुळे चोरीची वाळू घेणार्‍यामध्ये मोठी खळबळ उडाली असून काही वाळूवाल्यांनी हातोहात त्या ठिकाणावरून वरच्या मजल्यावर वाळू पळविण्याचा प्रकारही घडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

             गोणेवाडी परिसरात दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वा. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या टेंपोला पोलिस कर्मचारी गणेश सोलनकर यांनी कारवाईसाठी हात केल्यानंतर कारवाईच्या भितीपोटी चक्क त्या पोलिसाच्या अंगावर टेंपो घालून वाळू तस्करांनी चिरडण्याइतपत मजल गेल्याने पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.वाळू तस्कारांचा बिमोड करण्यासाठी रात्रीच्या वेळी बांधकामावर येवून पडणारी वाळू जप्त करण्याचा निर्णय डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या चर्चेतून पुढे आला आहे. 

            नदीपात्रातून वाळू भरून देणारे मजूर व चोरीची वाळू घेणार्‍यालाही यात आता सहआरोपी केले जाणार आहे.त्यामुळे नागरिकांनी बेकायदेशीर वाळू घेवू नये,अधिकृतरित्या वाळू खरेदी करून आपली बांधकामे पुर्ण करावीत असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी  रविवार दि. 3 आक्टोबर रोजी कार्यालयीन सुटी असतानाही दिवसभर मंगळवेढा शहरालगत असलेल्या दामाजीनगर,कारखाना मार्गावरील फिल्टर टाकी,शहरालगत असलेला बायपास या भागात सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे,मंडल अधिकारी धनंजय इंगोले,तलाठी उमेश सुर्यवंशी  यांना सोबत घेवून शहरातील गल्ली बोळ शोधत रावडे यांनी 10 ठिकाणी छापे टाकून 20 ब्रास वाळू जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने वाहनात भरून तीचा साठा  तहसील कार्यालय आवारात केला आहे.जप्त केलेल्या वाळूच्या प्रत्येक मालकाला प्रती ब्रास प्रमाणे 40 हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार रावडे यांनी दिली. ही मोहिम शहरात तीन दिवस चालणार असून पुढील टार्गेट तालुक्याचा ग्रामीण भाग असल्याचे सांगण्यात आले.

               शहरात वाळूसाठयावर कारवाई होत असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच बांधकाम मालकांनी हातोहात वाळू एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न केला.मात्र यातील पथकाने वरच्या मजल्यावर दडवून ठेवलेली वाळूही जप्त करून निःपक्षपातीपणे कारवाई केल्याने शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.काही बांधकाम मालकांनी मराठवाडा भागातुन वाऴू आनल्याच्या पावत्या दाखवुन कारवाईच्या कचाट्यातुन सूटन्याची पळवाट शाेधली मात्र तहसिलदार यांनी त्या पावत्या अमान्य करीत कारवाई केली.



Pages