मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुंकले निवडणुकीचे रणसिंग भाजपा सोडून सर्वपक्षीयाना एकत्रित घेऊन निवडणुका लढवण्याची मागणी युवकांना संधी देणार :- सिद्धेश्वर आवताडे - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 8, 2021

मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुंकले निवडणुकीचे रणसिंग भाजपा सोडून सर्वपक्षीयाना एकत्रित घेऊन निवडणुका लढवण्याची मागणी युवकांना संधी देणार :- सिद्धेश्वर आवताडे

 


मंगळवेढा/प्रतिनिधी

           मंगळवेढा तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती दामाजी कारखाना निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका लढविल्या जाव्यात तसेच या निवडणुकीमध्ये भाजपा सोडून सर्व पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन निवडणुका लढविण्याची मागणी आवताडे गटाच्याअनेक  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली दि.08 रोजी आंधळगाव आगामी येणाऱ्या निवडणुकीसदर्भात बबनराव आवताडे गटाने कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती.      


               यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे म्हणाले आगामी काळात येणाऱ्या दामाजी कारखाना जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वांना एकत्रीत घेऊन लढविल्या जाणार असून या निवडणुकीत निष्ठावंत तसेच युवक कार्यकर्त्याना संधी दिली जाणार आहे तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभावाने  न खचता नव्या उमेदीने जनतेच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आवताडे यांनी सांगितले संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष फिरोज मुलाणी म्हणाले की,दामाजी कारखान्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असून त्या विरोधात लोकशाही पद्धतीने  निवडणूक  लढायची असून ही निवडणूक बबनराव आवताडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे दामाजीच्या कारभाऱ्यांनी 10 रु किलो साखर पहिल्या दोन वर्षात न देता चालढकल केली परंतु आपण पाठपुरावा केल्याने सभासदांना साखर मिळाली आहे.

             दामाजी कारखाना डबघाईला आणला असून नव्या जोमाने कारखाना चालवण्यासाठी कोरोना सदृश्य अवस्थेत असलेल्या कारखान्याला बबनराव आवताडे रुपी रेमेडिसीवर इंजेक्शन देण्याचे आवाहन त्यांनी केले समाधान क्षीरसागर  यांनी ही आपले विचार व्यक्त केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडताना भाजपा सोडून सर्व पक्षांना एकत्रित निवडणुका लढविण्याची मागणी करीत बबनराव आवताडे यांनी कोणताही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे यावेळी सांगितले.

              तसेच सचिन कदम यांनी  कारखान्याच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कारखान्यावर  56 कोटीवरून 124 कोटी कर्ज केल्याचा आरोप केला यावेळी बैठकीच्या वेळी बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, विठ्ठल घुले, संजय पवार, ज्ञानेश्वर भगरे, फिरोज मुलाणी, प्रकाश जुंदले,  समाधान क्षीरसागर,अनिल पाटील,अनिल माळी,महादेव माळी काशीनाथ पाटील, रामचंद्र लेंडवे,अंकुश डांगे,दिलीप सावंत,आबासो लांडे,राजाभाऊ मेतकूटे, दिलीप भुसे,अशोक लेंडवे ,संजय क्षीरसागर, हिम्मत पाटील,सचिन कदम,विष्णू जांभळे, तुकाराम चव्हाण,प्रकाश सावंत,दादा बाळा लेंडवे, हणमंत अँड.दत्ता तोडकरी,शैलेश आवताडे, संजय जगताप ,जमीर शेख,सोपान चव्हाण ,पंडित ताणगावडे,तानाजी दिघे,मनोज चव्हाण,श्रीकांत पाटील,प्रशांत पाटील,बाळदादा नागणे यांच्यासह लक्ष्मी दहिवडी गणातील अनेक गावातील  सोसायटी व ग्रामपंचायत चे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक मोहसीन मुलाणी, आभार अंकुश डांगे यांनी  तर सूत्र संचालन भारत मुढे यांनी केले.     

             आंधळगाव येथे आयोजित बबनराव आवताडे गटाच्या विचार विनिमय बैठकीप्रसंगी व्यसपीठावर बबनराव आवताडे,सिद्धेश्वर आवताडे, ज्ञानेश्वर भगरे,रामचंद्र लेंडवे जालगिरे, काशीनाथ पाटील,समाधान क्षीरसागर,आदी उपस्थित होते

Pages