मंगळवेढयात तहसीलदारानी मंगल कार्यालयास ठोकले सील,अकृषिक वापराची परवानगी न घेतल्याने १ लाख ४ हजार ७२८ रुपये ठोठावला दंड...... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 8, 2021

मंगळवेढयात तहसीलदारानी मंगल कार्यालयास ठोकले सील,अकृषिक वापराची परवानगी न घेतल्याने १ लाख ४ हजार ७२८ रुपये ठोठावला दंड......

 

 दिव्य न्यूज नेटवर्क 

                मंगळवेढा पासून दीड किलोमीटर अंतरावर पंढरपूर रोडवर बायपास जवळ नव्याने झालेल्या रजपूत मंगल कार्यालय मालकाने सदर क्षेत्राची अकृषक वापरा करीता रीतसर परवानगी घेतली नाही तसेच यासाठी केलेला दंड ही न भरल्याने सदर कार्यालय तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी सोमनाथ जाधव व तलाठी उमेश सूर्यवंशी यांनी सील केले आहे रजपूत मंगल कार्यालय जागेबाबत तक्रार मिळल्यानंतर सर्कल जाधव यांनी चौकशी केली याबाबत अहवाल तहसीलदार यांच्या कडे सादर केला त्यावर तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांना ३० जून रोजी एका पत्राद्वारे सूचित केले होते . त्यावर सर्कल जाधव यांनी संबंधित मालकास १ लाख ४ हजार ७२८ रुपये दंड भरा अन्यथा कार्यालय सील केले जाईल असे सांगितले मात्र अद्याप त्यांनी दंडाची रक्कम भरली नाही. 

                  या कार्यालयात सील करावयास गेले असता सदर कार्यालयास शटर ,दरवाजा नसल्याने काय सील करावे हा प्रश्नही सर्कल जाधव यांना पडला होता .त्यावर त्यांनी एक मोठे हिरवे शेडनेट नी कार्यालय परिसर झाकला तसेच एका गेटला सील केले आहे . सील करण्याचे आदेश देऊनही सील केले नाही या मंगल कार्यालयात कार्यक्रम धडाक्यात सुरू आहेत अशी तक्रार सोलापूर येथील एका समाजसेवकाने केली होती.सर्कल जाधव व तलाठी उमेश सूर्यवंशी यांनी संबंधित मंगल कार्यालय सील केले आहे . 

              याबाबत पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही कार्यक्रम या कार्यालयात घेऊ नयेत अशा सक्त सूचना कार्यालय मालकास दिल्या आहेत.

Pages