देगांव ग्रामपंचायतीच्या प्लास्टिक संकलन केंद्राचे माजी मंत्री आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 17, 2021

देगांव ग्रामपंचायतीच्या प्लास्टिक संकलन केंद्राचे माजी मंत्री आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण....

 


दिव्य न्यूज नेटवर्क


               सोलापूर सोशल फाऊंडेशन व ग्रामपंचायत देगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समृद्ध गाव अभियान ’अंतर्गत  टाकाऊ तेलाच्या डब्यापासून तयार करण्यात आलेल्या  प्लास्टिक संकलन केंद्राचे ’ लोकार्पण माजी सहकार मंत्री, आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.  

 

              कार्यक्रमाला संचालिका मयुरी वाघमारे, मोहोन अनपट, सरपंच राणी ढेकळे, उपसरपंच शरद डोईफोडे, ग्रामसेविका राखी जाधव, विजय पाटील, विपुल वाघमारे, विजय कुचेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री व आ.. सुभाष  देशमुख यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बाल वाचनालयास दोनशे पुस्तके देण्यात आली. आ.देशमुख म्हणाले गावाला समृद्ध करण्यासाठी गावात मूलभूत सोयी सुविधा बरोबर रोजगार निर्मिती झाली पाहिजे. 

                  गावाची उत्पादकता वाढली पाहिजे, शहरातील पैसा गावात आला पाहिजे तर नक्कीच आपली गावे समृद्ध गावच्या दिशेने वाटचाल करतील असा विश्वास आ. सुभाष बापू देशमुख यांनी  उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना  व्यक्त करून  सोलापूर सोशल फाऊंडेशन सदैव आपल्या सोबत राहील असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

          देगाव येथे प्लास्टिक संकलन केंद्राचे उदघाटनप्रसंगी माजी मंत्री आ. सुभाष देशमुख,सरपंच राणी ढेकळे,ग्रामसेविका राखी जाधव व अन्य छायाचित्रात दिसत आहेत.

 


 

Pages