उजनीच्या कालव्यातून पाणी सोडा :- भगीरथ भालके,जलसंपदामंत्र्याकडे केली मागणी..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 14, 2021

उजनीच्या कालव्यातून पाणी सोडा :- भगीरथ भालके,जलसंपदामंत्र्याकडे केली मागणी.....

 

मंगळवेढा/प्रतिनिधी


              महिन्याभरापासून पंढरपूर सह मंगळवेढा तालुका परिसरात पावसाने दांडी मारल्याने बागायती क्षेत्र पाणी सोडले शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य भगीरथ भालके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

               पुणे परिसरात चांगला पाऊस झाल्याने सभोवताली असणारी धरणे भरली आहेत सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सुद्धा 60 टक्के पेक्षा जास्त भरले आहे आणखी काही दिवसांनी पूर्ण क्षमतेने धरण भरेल त्यावेळी भिमा नदीत अतिरिक्त पाणी सोडावेच लागेल मात्र सध्या पंढरपूर मंगळवेढा क्षेत्रात पाण्याअभावी पिके करपून जात आहेत त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत आता जर धरणातून उजनी कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडले तर शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल या अपेक्षेने माझ्या भागातील सर्व शेतकरी वर्गाला आपण पाणी सोडण्या बाबत सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे म्हणून आपण संबंधित विभागास याबाबत आदेश करावा ही विनंती करणारे पत्र भगीरथ भालके यांनी दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही पत्र दिले आहे 

                पंढरपूर मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज त्वरित संबंधित विभागाकडे द्यावेत.अनेकदा शेतकऱ्यांकडून पाणी मागणी होत नसल्याने तालुक्याच्या वाट्याचे, हक्काचे पाणी कमी होते आहे यासाठी स्व. आ.भारत भालके यांनी या भागातील शेतकऱ्यांना नेहमी पाणी मागणीचे अर्ज भरून द्यावेत असे आवाहन करायचे.

        तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन भगीरथ भालके यांनी केले आहे.


Pages