मंगळवेढा परिसरातून 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 3 म्हशी व 3 रेडया चोरटयांनी पळविल्या,या चोरीमुळे पशुपालकांमध्ये पसरली घबराहट... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 5, 2021

मंगळवेढा परिसरातून 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 3 म्हशी व 3 रेडया चोरटयांनी पळविल्या,या चोरीमुळे पशुपालकांमध्ये पसरली घबराहट...

 

मंगळवेढा/प्रतिनिधी 

                  मंगळवेढा परिसरातून तीघा शेतकर्‍यांच्या शेतातील गोठयामध्ये बांधलेल्या पंढरपूरी जातीच्या तीन म्हशी व तीन रेडया अशा एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,आत्तापर्यंत चोरटे घरफोडया करत होते.आता त्यांनी आपला चोरीचा मोर्चा जनावराकडे वळविल्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

                  या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी दादा बापू राजमाने यांचे मंगळवेढा शहरापासून मरवडे रोडलगत माने पेट्रोलपंपाजवळ शेतात वस्ती असून या गोठयात 60 हजार रुपये किमतीच्या दोन पंढरपूर जातीच्या काळया रंगाच्या म्हैशी बांधल्या होत्या. तसेच नागनाथ कुंडलिक राजमाने यांचीही 45 हजार रुपये किमतीच्या पंढरपूरी जातीच्या 3 रेडया,त्याचबरोबर हणमंत नारायण सुरवसे यांची 30 हजार रुपये किमतीची 8 महिने गाभण असलेली गौळारू म्हैस असे एकूण तीघापशुपालकांच्या 3 म्हशी व 3 रेडया एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दि.3 च्या पहाटे चोरटयाने टेंपोमधून मालकांच्या संमतीशिवाय चोरून नेला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.याचा अधिक तपास पोलिस हवालदार कोळी हे करीत आहेत.

              


                      एकाच वेळी तीन शेतकर्‍यांच्या 3 म्हशी व 3 रेडया चोरून नेल्यामुळे पशुपालकांत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.यापुर्वी चोरटयांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अनेक घरफोडया व मोटार सायकली पळविल्याच्या या घटना ताज्या असतानाच आता चोरटयांनी आपला मोर्चा पशुपालकांच्या जनावरांकडे वळविला आहे.पशुपालकांची जनावरे शेतामधून मोकळया मैदानात कुठेही बांधलेली असल्याने चोरटयांना चोरी करणे शक्य होत असल्याने जनावरांना ते टार्गेट करीत असल्याची चर्चा आहे.पोलिस या म्हशींचा शोध लावणार का ? असा सवालही पशुपालकांमधून केला जात आहे

Pages