पंढरीत ३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना पंचगंगा जलाभिषेक! - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 6, 2021

पंढरीत ३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना पंचगंगा जलाभिषेक!


पंढरपूर/प्रतिनिधी

           पंढरपूरमध्ये ३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शिवरायांना पाच नद्यांच्या पाण्याने व पंचामृताने अभिषेक छत्रपती सेवा समीती तर्फे करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की,१२ वर्षांपूर्वी प्रथम शिवराज्याभिषेक साजरा करण्याची व शिवरायांना पंचामृत अभिषेक करण्याची प्रथा सुरु झाली. ती आजतागायत सालाबादप्रमाणे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळा वर शिवराज्याभिषेक साजरा करण्याची परंपरा कायम आहे. दर वर्षी प्रमाणे शिवराज्याभिषेकाचे आयोजन सागर शरद कदम यांनी केले होते. 


               प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकाची व पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.नंतर शिवरायांच्या पुतळ्याला नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला,व पंचामृत अभिषेक करण्यात आला. पुतळा श्वेतवस्त्राने पुसुन पुष्पाहार घालून, धुपबत्ती लावून पुजा करण्यात आली.यावेळी युवकांनी जयघोष केला. 

                  यावेळी संदिप मांडवे, सागर कदम, शंकर सुरवसे, शेखर(बंटी) भोसले, गणेश जाधव, आकाश माने,स्वप्निल साठे, विजय मोरे, राधेश बादले पाटील, संदिप मुटकुळे, सतिश माने, गणेश थिटे, धनराज मोरे, वैजिनाथ जाधव, विश्वास मोरे,प्रविण शिंदे सर, विकी झेंड, सोमनाथ गांगुर्डे, गणेश मलपे, आकाश पवार, एस पी गायकवाड, काका मोलाणे, इम्रान तांबोळी, बशीर शेख, सागर चव्हाण,सोपान देशमुख, भास्कर जगताप,सिधार्थ गुरव,ओंकार चव्हाण,निचीकेत दुपडे, संकेत घोगरदरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Pages