कार्यकारी संचालकांनी सभासदांची दिशाभुल थांबवावी व शेतकऱ्यांचा राजवाडा सुस्थित राहण्यासाठी सत्याचा खुलासा करावा :-संतोष माने - Divyaprabhat News

Breaking News

Monday, June 28, 2021

कार्यकारी संचालकांनी सभासदांची दिशाभुल थांबवावी व शेतकऱ्यांचा राजवाडा सुस्थित राहण्यासाठी सत्याचा खुलासा करावा :-संतोष माने

 


मंगळवेढा/प्रतिनिधी

                  विशेष लेखा परीक्षकांनी दामाजी कारखान्याच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर कारखान्याच्या वतीने बाजू मांडताना शेतकऱ्यांचे ऊसबिल व कामगार पगार अदा करण्यासाठी साखर विक्री केली असल्याचा अजब खुलासा कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी पत्रकाद्वारे केला असला तरी तो खुलासा म्हणजे सभासदांची दिशाभुल  असून त्यांनी संचालक मंडळाच्या गैरप्रकारावर पांघरून न घालता सत्याचा खुलासा करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी दामाजी कारखान्याच्या प्रशासनाला केले आहे.

              कारखान्याकडे  २०० कोटींचे कर्ज नाही असे खुलासा मध्ये म्हटले आहे,शासनाने नियुक्त केलेले विशेषलेखा परीक्षक वर्ग १ यांनी केलेले अहवालात दोनशे कोटीचे कर्ज असल्याचे नमूद केले असून विशेष लेखा परीक्षकानी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून जर विशेष लेखा परीक्षक चुकीचे असतील किंवा कारखान्याचे कार्यकारी संचालकसाहेब यांना सहकारातील जास्त कळते असे म्हणावे लागेल. कारखाना ताब्यात घेताना 70 कोटी कर्ज असताना ते दोनशे कोटींवर कसे गेले तसेच कारखाना ताब्यात घेताना साखर,मोलसीस,बग्यास शिल्लक होते परन्तु आता 90 हजार पोत्यांची विल्हेवाट लावून 72 टक्के एफआरपी दिली म्हणून सांगणाऱ्या कार्यकारी संचालकांनी सध्या कारखान्याकडे किती साखर,मोलसीस बग्यास शिल्लक आहे हे सांगावे तसेच कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराची श्वेतपत्रिका काढून सभासदासमोर मांडावी कारखान्याच्या गैरकारभार झाकण्यासाठी आपण इतका चांगला खुलासा करत आहात तर खालील प्रश्नांचा पण खुलासा कराल अशी अपेक्षा तमाम सभासदवर्ग बाळगून आहे. 

               एम.एस.सी.बँक साखर कारखान्यांना ऊस बिल अदा करण्यासाठी, तोडणी वाहतूक ,कामगार पगार इत्यादीसाठी तारण कर्ज देते,जर तारण म्हणून घेतलेले २८ कोटी रुपये वरील कारणासाठी वापरले नाहीत का नसतील तर साखर तारणाचे २८ कोटी गेले कुठे? याचा खुलासा करावा,अन्यथा राजकीय सन्यास घ्यावा.लेखा परीक्षक यांनी बँकेचे डिटेल्स मागितले होते ते का ?उपलब्ध करून दिले नाहीत ?ते दिले असते तर खुलासा करण्याची वेळ आली नसती.

     

              कारखान्याच्या एकोणीस हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी नोटिसा का काढल्या? तुमचे संचालक मंडळ येण्याअगोदर सभासदांना वार्षिक सत्तर किलो साखर मिळत होती, दहा किलो साखर कमी का केली? बँकांची देणी दिली आहेत तर कारखान्याच्या वाहतुक दारांवर अजून कोर्टात केसेस अजून का चालू आहेत? चालू संचालक मंडळामार्फत गुपचूप शेअर्स विक्री का चालू आहे? कारखान्याच्या मयत कामगारांच्या वारसांना फंडाच्या रकमा अजून का दिल्या नाहीत? लाखो रुपये खर्च करून कोजनरेशन प्लांटचे भूमिपूजन केले त्याचं काम कुठपर्यंत आले आहे हे का सांगत नाही? कारखान्याची मळी, बगॅस, इथेनॉल यांच्या विक्रीतून आलेल्या नफ्याच काय? निवृत्त कर्मचाऱ्यांना अजून फायनल पेमेंट (ग्रज्यूएटी) का दिली गेली नाही? दोन वर्षापासून कामगारांच्या प्रा. फंडाच्या (भविष्य निर्वाह निधी) रकमा जमा का केला नाही? कारखाना कर्मचारी यांच्या नावे जीवन बिमा पॉलिसी उतरली परन्तु मयत किती कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला याचा लाभ मिळाला एकीकडे पगारी वेळेवर नाहीत दुसरीकडे मयत कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर विम्याचा लाभ न दिल्याने त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.

           जर तक्रार करणारे सभासद नाहीत याचा अर्थ तुम्ही असाच मनमानी कारभार करणार का? दामाजी कारखाना सहकारी कारखाना आहे ,खासगी कारखाना नाही त्यामुळे खुलासे करताना खुलासेदाराने याचे भान बाळगावे असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

Pages