मंगळवेढा शहरात बंगला फोडून एक लाख 52 हजाराचा मुद्देमाल पळविला घरफोडयातील चोरटयांना जेरबंद करण्यात पोलिसांना येतेय अपयश... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 20, 2021

मंगळवेढा शहरात बंगला फोडून एक लाख 52 हजाराचा मुद्देमाल पळविला घरफोडयातील चोरटयांना जेरबंद करण्यात पोलिसांना येतेय अपयश...

 


मंगळवेढा/प्रतिनिधी 

               मंगळवेढा शहरातील संभाजी नगर भागातील एका शेतकर्‍याच्या बंगल्याचे  लोखंडी खिडक्याचे गज तोडून घराचा दरवाजा आतून बंद करून  कपाटात ठेवलेले एक लाख 52 हजा रुपये किमतीचे सोने,चांदी,रोख पैसे असा मुद्देमाल चोरटयाने  चोरून नेला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान घरफोडयांतील चोरटयांना जेरबंद करण्यात पोलिसांना आत्तापर्यंत अपयश आल्याने या चोरीचा तपास करणे  पोलिसांना एक आव्हान आहे.मंगळवेढा शहरातील संभाजी नगर भागात  फिर्यादी श्रीपात विठ्ठल गोवे  हे रहात असून दि. 18 रोजी जेवण करून फिर्यादीचे आई वडील पोर्चमध्ये  झोपले होते.    

             सकाळी सहा वाजता आई उठून अंगण झाडून दुसरी खोली झाडण्यासाठी रूममध्ये जात असताना आतून  कडी लावल्याने फिर्यादीच्या आईला खोलीचा दरवाजा उघडता आला नाही. म्हणून खोलीच्या पाठीमागे जावून खिडकीतून पाहिले असता लोखंडी खिडकी तोडलेली दिसली.व बाजूला कपाटाचा ड्रॉवर,स्टिलचे डब्याचे छाकण अन्यत्र पडलेले दिसले.चोरटयांनी खिडकीचे लोखंडी गज तोडून घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद करून कपाटाच्या बाजूला हँगरवर ठेवलेली चावी घेवून लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 52 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

            या चोरीचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान,या पुर्वीही मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अनेक चोर्‍या झालेल्या आहेत. मागील आठवडयात हुलजंती येथे चोरटयांनी बंगला फोडून लाखाच्या वर मुद्देमाल पळविला होता. आत्तापर्यंत झालेल्या एकाही चोरीच्या तपासाचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आल्याने दिवसेंदिवस चोरटयांचे धाडस वाढत चालले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.जोपर्यंत चोरटयांना पोलिस जेरबंद करणार नाहीत. तोपर्यंत चोरीची मालिका थांबणार नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.घरफोडयांबरोबर मोटर सायकली चोरण्याचे प्रमाणही वाढले आहे.पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी मंगळवेढयातील वाढत्या चोर्‍यांबाबत लक्ष घालून येथील चोर्‍यांचा छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Pages