30 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्या पोलिस नाईकला एक दिवसाची पोलिस कोठडी.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, June 16, 2021

30 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्या पोलिस नाईकला एक दिवसाची पोलिस कोठडी....

मंगळवेढा/प्रतिनिधी 
             वाळूच्या ट्रॅक्टरवर  कारवाई न करण्यासाठी व साहेबांना हप्ता देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच ट्रॅक्टर चालकाकडे  मागितल्याप्रकरणी पोलिस नाईक संतोष चव्हाण याला लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता  एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

                     या घटनेची हकिकत अशी,बोराळे येथील एका इसमाचा वाळूचा ट्रॅक्टर  आरोपी संतोष चव्हाण याने पकडून पोलिस स्टेशन आवारात आणून लावला होता. या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी व साहेबांना हप्ता देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी  भ्रमणध्वनीवरून  चव्हाण यांनी केली होती.ट्रॅक्टर मालकाने सदरची तक्रार पुणे लाचलुचपत विभागाकडे केल्यानंतर या भ्रमणध्वनीवरील संभाषणाची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी  फरार होता. 
              पंढरपूर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. सोमवार दि. 14 जून रोजी अखेर तो पोलिस नाईक लाच लुचपत विभागाकडे शरण आला.या आरोपीला तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक कविता मुसळे यांनी मंगळवारी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.सारंग वांगीकर यांनी ते साहेब कोण आहेत याची चौकशी करणे व इतर तपास  करावयाचा असल्याचे मुद्दे न्यायालयापुढे मांडल्यानंतर न्यायालयाने दि.16 रोजी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Pages