अखेर उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश!उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याची योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र शासनाने दिले.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, May 27, 2021

अखेर उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश!उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याची योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र शासनाने दिले..

 

दिव्य न्यूज नेटवर्क

           उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे योजनेसाठी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वीच रद्द केला होता.

   

                  आता याबाबतचे लेखी पत्र शासनाच्या सचिवांनी काढले आहे इंदापूरला पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध होता.योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र हवे यासाठी वारंवार आंदोलने चालू होती. दरम्यान जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास मंजुरी दिलेले शासन पत्र आज 27 मे रोजी रद्द केले आहे.


Pages