ब्रेकिंग न्यूज :- नागेश हेगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पाेलीसावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा होलार समाज संघटनेची मागणी... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 26, 2021

ब्रेकिंग न्यूज :- नागेश हेगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पाेलीसावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा होलार समाज संघटनेची मागणी...


मंगळवेढा / प्रतिनिधी

                नंदुर( ता.मंगळवेढा )येथील मयत नागेश नाथा हेगडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या  महिला पोलिस अधिकारी व पाेलिस कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा व ॲट्रॉसिटी  गुन्हा दाखल करावा  या मागणीसाठी आज मंगळवेढा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.

             यावेळी राज्य संघटक प्राचार्य मधुकर भंडगे, संघटनेचे नेते हैदर केंगार, सामाजिक कार्यकर्ते संजय गेजगे,संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी केंगार, मुलाचे वडील नाथाजी हेगडे, आप्पासो हेगडे हे उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, तालुक्याचे आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी अतुल झेंडे याना मेलद्वारे निवेदन पाठवलेले आहे.

  

                सदर घटनेचे सविस्तर वृत्त असे की नंदुर तालुका मंगळवेढा येथील नाथा हेगडे होलार समाजातील एक गरीब कुटुंब असून ऊसतोडणी व मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढित आहेत,मंगळवेढा पोलीस खात्याच्या कारवाईत टार्गेट ठरविलेले हेगडे कुटुंब अडचणीत सापडले असून,अवैध धंद्याशी कोणताही संबंध नसताना मयत नागेश नाथा हेगडे याचा पोलीस खात्याकडून करण्यात  आलेल्या कारवाईत नाहक बाळी गेला, याला पूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार आहे,  त्यामुळे हे कुटुंब आज उघड्यावर आहे,वीस वर्षाची पत्नी विधवा झाली,सव्वा वर्षाचा मुलगा पोरखा झाला.  सदर घटनेबाबत पोलीस खात्याकडे न्याय मागत असताना अधिकाराचा दुरुपयोग करीत पोलिसांकडून या कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय,शिवाय सर्व पुरावे आपल्या बाजूने होण्यासाठी पोलीस यंत्रणा कटाक्षाने प्रयत्नशील आहेत.

                मंगळवेढा पोलीस खात्याच्या दहशतीमुळे सतत केलेल्या कारवाईमुळे हेगडे कुटुंबावर मोठे संकट असून  एका मुलाचा बळी गेला  असतानाही सतत आजारी असणाऱ्या मातेवर दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून पोलीस खात्यानी अकलेची तारे तोडण्याचा प्रयत्न केला आहे,पोलिसांच्या दहशतीमुळे मयत नागेश हेगडे याचा बळी गेला हे पोलीस खात्याला ज्ञात असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून अधिकाराचा दुरुपयोग करीत या कुटुंबावर अन्याय केला जातोय,यासाठी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने हेगडे कुटुंबावर होत असलेल्या अन्याया विरोधात  आवाज उठवित आहोत,नागेश नाथा हेगडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले पोलीस व कर्मचारी मोकाट आहेत.तपास अधिकारी  यांनी  हेगडे कुटुंबाला निपक्षपाती पणे न्याय द्यावा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आज होलार समाज संघटनेकडून करण्यात आली  आहे.

           जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांनी हेगडे कुटुंब नातेवाईकांना दोन दिवसात मयत नागेश हेगडे याच्या मयतास जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी लेखी हमी देवून ही आज सात दिवस ओलांडुनी ही कारवाई झाली नाही, तरी प्रशासनाने हेगडे कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा लॉक डाऊन संपताच समस्त होलार  समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आज देण्यात आलेल्या निवेदनात होलार समाजाने दिला आहे.

Pages