बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा भगिरथ भालके यांना पाठिंबा..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 6, 2021

बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा भगिरथ भालके यांना पाठिंबा.....

मंगळवेढा/प्रतिनिधी

       श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखाना सुस्थितीत यावा म्हणून बळीराजा परिवार व काही वेगवेगळया पक्षातील समविचारी कार्यकर्ते यांनी सभासदाचे प्रबोधन व्हावे  म्हणून एक मोहिम हाती घेतलेली आहे.त्याचे काम गेले ६ महिने झाले सुरू आहे.साखर कारखान्याचा आर्थिक लेखाजोखा यांची वस्तूस्थिती सभासदासमोर मांडून हा साखर कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी बळीराजा परिवार व संबंधित ग्रुप कार्यरत आहे.
           

                         मध्येच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक आल्यामुळे या आपल्या आघाडीने कोणाला पाठींबा द्यावा यावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी रविवार दिनांक ०४/०४/२०२१ रोजी दुपारी ४ वाजता प्रमुख शेतकऱ्यांची  बैठक बळीराजा पतसंस्थेच्या हाॅलवर घेण्यात आली.त्यामध्ये मोठया प्रमाणावर शेतकरी सभासद हजर होते.या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एक कमिटी स्थापन करून त्यांनी निर्णय घ्यावा व तो सर्वांनी मान्य करावा असे ठरले. कमिटीमध्ये श्री दामोदर देशमुख,अशोक वाकडे,यादाप्पा माळी,प्रकाश गायकवाड, तुकाराम कुदळे व संजय कट्टे यांची निवड करण्यात आली.या कमिटी सदस्यांनी वेगवेगळया पर्यांयाचा  विचार करून पहावा व आपल्या पुढील कार्यास सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मदत करणाऱ्या  उमेदवारास पाठींबा द्यावा असा निर्णय या शेतकरी बैठकीत घेण्यात आला व २-३ दिवसात हा निर्णय उपस्थित शेतकऱ्यांना वेगवेगळया माध्यमाद्वारे कळविण्यात यावा असे या बैठकीत ठरले.
        सोमवार दि ५/४/२०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता कमिटीने श्री भगिरथ भालके यांना बोलावून घेतले व दामाजी साखर कारखान्याबाबत शेतकऱ्याच्या असणाऱ्या भावना त्याना अवगत करण्यात आल्या.यावर जवळपास १.३० तास चर्चा होवून उमेदवारानी शेतकऱ्याच्या भल्यासाठी दामाजी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये आपण सर्वजण मिळून एकत्रीतपणे कर्जाच्या गाळात रूतलेला कारखाना बाहेर काढण्यासाठी सहकार्य करू यावर एकमत झाले.त्यामध्ये बळीराजा परिवाराचे प्रमुख श्री दामोदर देशमुख,व्हा.चेअरमन अशोक वाकडे,श्री संजय कट्टे सर,यादाप्पा माळी,प्रकाशआप्पा गायकवाड, तुकाराम कुदळे भाऊसो,अँड.भारत पवार,श्री एकनाथ फटे, श्री विठ्ठल गुरूनाथ आसबे,स्विय सहायक रावसाहेब फटे व उमेदवार श्री भगिरथ भालके यांनी सविस्तर प्रत्येक बाबीवर कसा मार्ग काढायचा या विषयी चर्चा केली.सर्व कमिटी सदस्यांनी राष्ट्रवादीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांना पाठींबा देणेचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Pages