दामाजी कारखान्याचे 19 हजार सभासद 'भाजपच्या' उमेदवारावर नाराज ? - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, April 4, 2021

दामाजी कारखान्याचे 19 हजार सभासद 'भाजपच्या' उमेदवारावर नाराज ?

 

मंगळवेढा/प्रतिनिधी

             पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची रणधुमाळी सुरू असून,भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वोत परीने प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत.

       

                 परंतु काही महिन्यांपूर्वी संत सहकारी दामाजी कारखान्यातील तब्बल 19 हजार शेतकऱ्यांचे सभासद सदस्यत्व रद्द करण्यासाठी भाजपचा एका बड्या नेता अतोनात प्रयत्न करत होता. परंतु संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातील 19 हजार शेतकऱ्यांचे सभासद सदस्यत्व कायम राहावे यासाठी तत्कालीन आमदार स्व.भारत भालके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. व न्यायालयाने तत्कालीन आमदार स्व.भारत भालके यांच्या बाजूने निकाल दिला.व 19 हजार शेतकऱ्यांचे सभासदस्यत्व शेतकऱ्यांचे सदस्यत्व कायम राहिले.

          त्यामुळे 19 हजार शेतकऱ्यांचे सभासद सदस्यत्व पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यावर १९ हजार शेतकरी सभासद बांधव नाराज असून,या नाराजीचा मोठा मताधिक्याचा फटका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला नक्कीच बसणार आहे.अशी तालुक्यातील मतदारां मधून चर्चा होत आहे.त्यामुळे भाजपचे प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्याचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Pages