मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात भाजपला खिंडार ; ढाण्या वाघाचा भगीरथ भालके यांना पाठिंबा...... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, April 14, 2021

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात भाजपला खिंडार ; ढाण्या वाघाचा भगीरथ भालके यांना पाठिंबा......नंदेश्वर विशेष (प्रतिनिधी) 

           पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांनी आज पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांना बिनशर्त शेकडो कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिलेला आहे.

               

                   नंदेश्वर गावात पालकमंत्री दत्ता भरणे येताच त्यांचे स्वागत दादासाहेब गरंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गजे ढोल,बॅन्जो पार्टी व हलगी वाजवून भंडारा कपाळावरती लावून स्वागत केले. 

          कै.भारत भालके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत आलेली आहे.अगदी मतदान तीन दिवसावर येऊन ठेपले असताना भोसे जिल्हा परिषद गटात कायम धबधबा असणारे व सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथील दक्षिण भागाचा ढाण्या वाघ म्हणून अबालवृद्धांना परिचित असणारे दादासाहेब गरंडे यांनी आज अचानकपणे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीचे पारडे जड केलेले आहे.

             खऱ्या अर्थाने दादासाहेब गरंडे यांच्या पाठिंब्याने परिचारक- आवताडे गटाला भोसे जिल्हा परिषद गटात खिंडार पडलेली असुन भगीरथ भालके यांना सर्वाधिक मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

Pages