तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, March 13, 2021

तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.....


दिव्य न्यूज नेटवर्क


                तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या वतीने जागतिक महिला सप्ताहानिमित्त महिला सबलिकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 16 महिला आणि कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्राला तेजस्विनी महिला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. दरम्यान समृतचिन्ह,प्रमाणपत्र आणि साडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

             


          हा पुरस्कार वितरण सोहळा वाडा इथे पी.जे.हायस्कुल सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जि.प.अध्यक्ष श्रीमती भारती कामडी तर पं.स.वाडाच्या माजी सभापती श्रीमती मृणाली नडगे आणि वाडा उप नगराध्यक्ष श्रीमती वर्षा गोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष संजीवनी संजय मोकाशी यांनी केले.सूत्रसंचालन  कल्पना संतोष जाधव यांनी केले.


पुरस्कार्थीची यादी याप्रमाणे....

               विमलताई पटेकर (जव्हार), लक्ष्मीताई भोये (जव्हार), कृषी विज्ञान केंद्र (कोसबाड हिल), वैशाली लोंढे ( बारामती), सारिका जाधव(वाडा) तेजस्विनी जोशी (कोल्हापूर), राजश्री तरसे (वाडा) निलेशा पष्टे (वाडा), मीरा भोईर (नाशिक), सुप्रिया उराडे (पालघर) डॉ कविता देशमुख (पुणे), वैशाली पष्टे (वाडा), रेश्मा पाटील (वाडा), कल्पना जाधव (मुंबई),

नम्रता राव (वाडा), रुपाली बाबरेकर (डहाणू), संगीता मोरे (बेळगाव) वाडा येथे महिला दिनानिमीत्त कतृत्वान महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करन्यात आला या प्रसंगी टीपलेले छाया चित्र

Pages