भोसे प्रादेशिक योजना शिखर समिती पदाधिकारी निवडीत माजी सभापतींचा हेकेखोरपणा 39 गावाला वेठीस धरण्याचा प्रकार.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, March 9, 2021

भोसे प्रादेशिक योजना शिखर समिती पदाधिकारी निवडीत माजी सभापतींचा हेकेखोरपणा 39 गावाला वेठीस धरण्याचा प्रकार....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

          मंगळवेढा तालुक्यातील भोसे व 39 गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजने वर नियंत्रण ठेवन्यासाठी शिखर समिती स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या दि.8 रोजीच्या बैठकीत पंचायत समिती सत्ताधारी गटाला बहुमत नसल्याचे लक्षात आल्यानंतर  माजी सभापती खांडेकर यांनी आपल्या मर्जीतील सरपंचाला अध्यक्ष होता येत नसल्याचे लक्षात येताच सभापती प्रेरणा मासाळ यांना सांगून सदर बैठक रद्द केली परंतु थोड्या वेळाने उपसभापती सुरेश ढोणे यांनी सर्व सरपंच व अधिकारी यांची बैठक घेण्यात आलेल्या ठरावातून  अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड रीतसर पणे जाहीर करावी अन्यथा सभागृहाबाहेर अधिकाऱ्यांना जाऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेत सचिव असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता राजकुमार पांडव यांना तब्बल सभागृहात अडवून ठेवले दरम्यान हुंनूर येथील सरपंच मनीषा खताळ यांनी पालकमंत्री दत्ता(मामा)भरणे यांना फोन लावून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पालकमंत्र्यानी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना फोनवरून शिखर समिती तातडीने निवडण्याच्या सूचना दिल्या

                सध्या बंद असलेल्या भोसे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचीदुरुस्ती सुरू आहे ही योजना सुरू ठेवण्यासाठी व संबंधित गावाकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी शासन नियमाप्रमाणे शिखर समिती स्थापन करण्यासाठी शासनाकडून अनेक वेळा येथील अधिकाऱ्यांना कळविले होते परंतु चालढकल झाल्याने योजना बंद पडली परंतु  उपसभापती सुरेश ढोणे यांच्या पत्राने  दि.8 रोजी मंगळवेढा पंचायत समितीमध्ये पाणीपुरवठा समिती बैठक आयोजित केली होती परंतु यावेळी सभापती प्रेरणा मासाळ या सभेच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी त्यांच्या सोबत असणारे माजी सभापती प्रदीप खांडेकर यांना  आपल्या गटाचा समितीचा अध्यक्ष होत नसून विरोधी गटाकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जास्त ठराव गोळा झाल्याचे लक्षात येताच त्यांनी योजनेचे काम अपूर्ण असल्याचे सांगतले यावेळी योजना पूर्ण झाली असून योजना चालू करण्यासाठी शिखर समिती होणे आवश्यक असल्याचे अधिकारी पांडव सांगत असतानाही  बैठकीत प्रदीप खाडेकर यांच्याबरोबर रमेश भांजे,नितीन पाटील यांची या करणावरून जोरात खडाजंगी झाली बैठक रद्द केल्याचे सांगत मासाळ व खांडेकर हे सभेतून निघून गेले परंतु या बैठकीसाठी आलेल्या अनेक सरपंचांनी पुन्हा  बैठक घेण्याची मागणी केली त्यानंतर काही वेळा नंतर उपसभापती सुरेश ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 

परंतु यावेळी पांडव यांनी मला निवड घेता येत नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न चालू केला त्यानंतर उपसभापती सुरेश ढोणे यांनी पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता राजकुमार पांडव यांना  संबंधित गावच्या सरपंचाला मिटिंगचा अजेंडा माझ्या सहीचा दिला आणि मीटिंग रद्द करायचा निर्णय परस्पर घेतला का असा सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला.सदर बैठक माझ्याच अध्यक्षेतेखाली घ्या असा आग्रह धरला.अन्यथा सभागृहाबाहेर जावू देणार नाही असे सुनावले त्यानंतर हा प्रकार रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होता दरम्यान त्या अधिकार्याच्या आडमुठ्या धोरणाबाबत हून्नरच्या सरपंच मनीषा खताळ यांनी पालकमंत्री भरणे यांच्याकडे  फोनद्वारे तक्रार केल्यानंतर भरणे यांनी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारि अधिकारी यांना फोन करीत तातडीने शिखर समिती स्थापन करून त्या गावातील लोकांना पाणीपुरवठा सुरू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत

Pages