आंधळगावच्या कामचुकार,आर्थिक पिळवणूक करणाऱ्या तलाठ्यावर कारवाईची मागणी... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 17, 2020

आंधळगावच्या कामचुकार,आर्थिक पिळवणूक करणाऱ्या तलाठ्यावर कारवाईची मागणी...

 

 मंगळवेढा/प्रतिनिधी

           मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील तलाठी मनोज सपकाळ हे सातत्याने गैरहजर राहून खाजगी व्यक्ती द्वारे सजात न येता कारभार पहात असल्याने विविध दाखले,नोंदीसाठी नागरिकांची गैरसोय करून आर्थिक पिळवणूक होत असल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील सचिन रामचंद्र नागणे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

            आंधळगाव हे जास्त लोकसंख्या असलेलं गाव असून येथे कायमस्वरूपी  तलाठी असणे गरजेचे असताना येथील अतिरिक्त पदभार लेंडवेचिंचाळे येथील तलाठ्याकडे दिला आहे मात्र हे तलाठी आपल्या सोयीने मंगळवेढा येथून व आठवड्यातून एक दिवस येऊन गावचा कारभार हाकत असतो कोणत्याही नोंदी व दाखल्यासाठी झिरो मार्फत चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत.

           

तसेच जमीन खरेदी केलेल्या व्यक्तींच्या जमिनीच्या नोंदी धरताना त्यांच्या विरोधकांना उठवून हरकत घेण्यास सांगत आपली आर्थिक तुंबडी भरण्याचा उद्योग सुरू केल्याने व दाखले व नोंदीसाठी होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे रखडली जात आहेत तसेच नागरिकांना अनेकवेळा अरेरावीची भाषा बोलली जात असून माझी बदली करा मी कोणाला भीत नाही कोणाकडे जायचे तिकडे जा अशी उत्तरे दिली जातात.           

            तसेच काही महसुलची कामे  तलाठी स्वता न करता खाजगी व्यक्तीकडून करून घेत असतात त्यामुळे अनेकांना काही लाभापसून वंचित राहावे लागले आहे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानी बाबत व पंचनामा कामाबाबत तलाठी सपकाळ यांनी पुर्णतः निष्क्रीय पणा दाखविला आहे सध्या शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने संकटात असताना महसूल विभागातील गावचा कणा असणाऱ्या तलाठ्याकडून शेतकरी त्रासाला आहे  त्यामुळे गावात न  येता  उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करणाऱ्या व नागरिकांना त्रास देणाऱ्या तलाठी सपकाळ यांच्यावर  तत्काळ कारवाई करण्याची मागणी सचिन नागणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Pages