ग्रामीण भागात गवळणीच्या रचनेने दिवाळी सण होतोय पारंपरिक पद्धतीने साजरा... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, November 16, 2020

ग्रामीण भागात गवळणीच्या रचनेने दिवाळी सण होतोय पारंपरिक पद्धतीने साजरा...


दिव्य न्यूज नेटवर्क


       दिवाळी म्हणजे दीपोत्सव आनंदाची उत्साहाची पर्वणी होय दिवाळी सणात काळाबरोबर अनेक बदल स्वीकारत आधुनिक झगमगाटात हायटेक दीपावली साजरी होत आहे पण यामध्ये जुन्या रुढी,परंपरा, संस्कृतीचे पालन करत ग्रामीण भागात दीपावली पाच दिवस घराच्या अंगणात पांडव गवळणी घालण्याची परंपरा आजही मोठ्या प्रमाणात जपली जात आहे

          दिवाळी म्हणजे दीपोत्सव आनंद आणि उत्साहाची पर्वणी होती दिवाळी सणात काळाबरोबर अनेक बदल स्वीकारत आधुनिक झगमगाटात हायटेक दीपावली साजरी होत आहे यामध्ये ही जुन्या रुढी परंपरा व संस्कृतीचे पालन करत ग्रामीण भागात दीपावलीत पाच दिवस घराच्या अंगणात पांडव गवळणी घालण्याची परंपरा आजही मोठ्या प्रमाणात जपली जात आहे

       


अशा हायटेक दिपोत्सवातही भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्याचे व ग्रामीण भागात आजही शेणाच्या पांडव व  गवळणीतून आपल्याला पाहायला मिळत आहे. एकादशीपासून वसुबारस,धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी,,लक्ष्मीपूजेन, बलिप्रतिपदा अर्थात पाडवा असे पाच दिवस घरातील अंगणात तुळशी वृंदावनाजवळ शेणामातीचे  पांडव व गवळणी-पेंद्या तयार केला जातात त्याची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला जातो सभोवताली सडासंमार्जन,सुबक,रांगोळी दिव्यांची आरास केली जाते.

            महिलावर्ग यासाठी खास तयारी करत असल्याचे दिसते खवय्यांसाठी दुकानाच्या थाटामाटात ही घरोघरी पारंपरिक फराळाच्या पदार्थांचे रेलचेल ही तर महिलांच्या सुगरणपणाची दाद मिळवणारी बाब दिसून येत आहे कोरोना संसर्ग काळात ग्रामीण भागात आजही आबालवृद्ध दिवाळी सणाचा आनंद पारंपरिक पद्धतीने घेत आहेत

Pages