स्वतः आजारी असतानाही मतदारसंघातील लंपी बाधित जनावरांना वाचवण्यासाठी आ.भालके यांची धडपड.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 5, 2020

स्वतः आजारी असतानाही मतदारसंघातील लंपी बाधित जनावरांना वाचवण्यासाठी आ.भालके यांची धडपड....

दिव्य न्यूज नेटवर्क   

               आ.भारत भालके हे कोरोना झाल्यामुळे पुण्यात उपचार घेत असताना मंगळवेढा तालुक्यात जनावरांना लंपीची साथ आल्याचे समजताच स्वतःआजारी असताना तालुक्यातील पशुधन जगले पाहिजे या हेतूने आ.भालके यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व  जिल्हाधिकारी यांना तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे त्यांच्या सतर्कतेमुळे व जनतेची काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे.

             

मंगळवेढा तालुक्यात प्रामुख्याने  शेतीबरोबर दुग्धव्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो तालुक्यातून रोज सुमारे दीड लाख लिटर दुधाचे संकलन होत असते दुधउत्पादक शेतकऱयांनी नैसर्गिक संकट येऊन देखील आजपर्यंत पदरमोड करून जनावरांची जोपासना केली  परंतु गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यात  गाय, म्हैस, बैल,संकरित जनावरांना लंपी  रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे जनावरांना बारीक ताप, शरीरावर गाठी,नाकातून व तोंडातून पाणी येणे,तसेच तोंडात उठलेली व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होत असल्याने जनावरे दगावू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीच्या व महापुराने मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे 

          कोरोनाणे अगोदरच कंबरडे मोडले आहे त्यात लंपी या रोगामुळे जनावरांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे येथील पशुधन विभागाकडे या रोगावरील लस अपुरी असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याने शेतकऱ्याचे पशुधन वाचविण्यासाठी तातडीने पंढरपूर,मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील जनावरांची संख्या पाहता बाधित जनावरांच्या उपचारासाठी लस उपलब्ध करून देण्याची मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे  सध्या आ.भालके हे जरी पुणे येथे उपचार घेत असले तरी त्यांचे लक्ष स्वताच्या तब्येतीकडे देण्याऐवजी  मतदारसंघातील समस्या सोडवन्यावर आहे  

         मतदारसंघात जनावरांना लंपी रोगाची लागण झाली असून लसीचा तुटवडा असल्याचे समजताच त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये पशुधन वाचले पाहिजे यासाठी त्यांनी तत्काळ मंत्री महोदयांना लसीची मागणी केली स्वतः आजारी  असताना  आजारपणात देखील अडचण घेऊन येणाऱ्या नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी आ.भालके हे कार्यरत असल्याने त्यांच्या कामाबाबत कौतुक होत आहे

Pages