नंदेश्वर येथे आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 2, 2020

नंदेश्वर येथे आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन...


मंगळवेढा/प्रतिनिधी 

             आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात भव्य रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान सप्ताहाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर मित्रपरिवाराने केलेले आहे;तसेच याची अंमलबजावणीही संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात उत्साहात दिसून येत आहे.

             


सद्यस्थितीत कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व रक्ताची कमतरता या सर्व गोष्टींचे भान ठेवून नंदेश्वर येथील युवकांनी आ.गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील आ.गोपीचंद पडळकर मित्रपरिवाराने रविवार दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी नंदेश्वर येथील बसस्थानकापाठीमागील हनुमान मंदिरा शेजारील सभागृहात भव्य अश्या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून या रक्तदान शिबिरासाठी सांगोला येथील रेवनिल ब्लड बँक उपस्थित राहणार असून उपस्थित रक्तदात्यांना हेल्मेट किंवा वीस लिटरचा पाण्याचा जार भेट देण्यात येणार असून तरी या  रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन आ.गोपीचंद पडळकर मित्रपरिवाराने  केलेले आहे.




Pages