मंगळवेढा ब्रेकिंग:- खरेदीखताच्या नोंदीसाठी लाच घेणाऱ्या हुलजंतीच्या मंडल धिकाऱ्यांला"लाचलुचपत' विभागाचा दणका.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, September 24, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग:- खरेदीखताच्या नोंदीसाठी लाच घेणाऱ्या हुलजंतीच्या मंडल धिकाऱ्यांला"लाचलुचपत' विभागाचा दणका....


दिव्य प्रभात न्युज नेटवर्क 

            तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी   हुलजंती मंडलचे मंडल अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे यांनी दहा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अधिकारी व  कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.

           


  या घटनेची हकिकत अशी,तक्रारदार याने लवंगी येथे एक एकर जमीन विकत घेतली होती. सदर जमिन खरेदीचे दस्तावर हरकत घेणारा तक्रारी अर्ज आला होता. या अर्जावर तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी आरोपी तथा मंडल अधिकारी सत्यवान घुगे याने 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने दि. 23 रोजी सोलापूर येथे लाच लूचपत विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. याची पडताळणी केली असता मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. 

                यावेळी सापळा लावला असता रक्कम स्विकारत असताना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई पुणे येथील लाच लुचपतचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक संजय पाटील,पोलिस निरिक्षक जगदीश भोपळे,महिला पोलिस निरिक्षक कविता मुसळे,पोलिस नाईक अर्चना स्वामी,पोलिस हवालदार चंद्रकांत पवार,पोलिस नाईक पदमानंद चंगरपल्लू,पोलिस नाईक प्रमोद पकाले यांनी हा सापळा यशस्वी केला.दरम्यान,आरोपी घुगे यांच्याविरूध्द रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

             लाचलुचपत पथकाने त्या मंडल अधिकार्‍याच्या घराची झडती घेतली उदया न्यायालयात उभे केले जाणार आहे. या मंडल अधिकार्‍याच्या या पुर्वीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कारवाईची वेळ आल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती.




Pages