मंगळवेढा पोलिस ठाण्यात प्रशिक्षणार्थी महिला फौजदार दाखल.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 16, 2020

मंगळवेढा पोलिस ठाण्यात प्रशिक्षणार्थी महिला फौजदार दाखल....

 

दिव्य न्युज नेटवर्क

          मंगळवेढा पोलिस ठाण्यात महिला पोलिस उपनिरिक्षक प्रणोती रघुनाथ यादव या प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत झाल्या आहेत.दरम्यान,या महिला पोलिस अधिकार्‍यामुळे महिलांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

           


मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव या प्रशिक्षणार्थी म्हणून नुकत्याच हजर झाल्या आहेत. त्या सन 2018 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.नाशिक येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्या 8 जानेवारी रोजी सांगोला पोलिस स्टेशनला हजर झाल्या होत्या. त्यांना मंगळवेढा पोलिस ठाण्यात संलग्न करण्यात आले आहे.त्या मुळच्या सोनी ता. मिरज जि.सांगली येथील आहेत.यादव यांनी पहिली कारवाई अवैध वाळू वाहतुकीवर करून आरोपीला तात्काळ अटक करीत वाळूवाल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

           सदर वाळू गुन्हयाचे आरोपपत्र केवळ 28 दिवसात न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवेढयात महिलाविषयक गुन्हयाचे प्रमाण जास्त असल्याने येथे महिला अधिकार्‍यांची नितांत गरज होती. वारंवार महिला वर्गातून महिला पोलिस अधिकारी नेमण्याची मागणी होत होती. मागील पाच वर्षापुर्वी सहाय्यक पोलिस निरिक्षक सरोजीनी चव्हाण यांची बदली झाल्यानंतर या पोलिस ठाण्याला महिला पोलिस अधिकारी मिळाल्याच नाहीत. 

               महिला आरोपी व तक्रारी घेवून येणार्‍या महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महिला अधिकारी असणे गरजेचे होते. यादव यांच्या रुपाने महिला अधिकारी मंगळवेढयाला भेटल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Pages