मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा तालुक्यातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, July 15, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा तालुक्यातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह.....


दिव्य न्युज नेटवर्क

           मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची मंगळवेढ्यातील ही पहिलीच घटना असून
        मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील रहिवासी असलेले व सलगर (बु) येथे कामास असलेल्या एका डॉक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती मंगळवेढा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
       
 मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील रहीवासी असलेले व सलगर(बु).येथे कार्यरत असलेले एका डॉक्टर पुरुष व्यक्तीचा दि.15 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असून.त्यांचेवर सध्या सोलापूर येथे उपचार चालु आहेत.
         सदर व्यक्तीचे निकट संपर्कात ( high risk contacts) आलेल्या व्यक्तींची संख्या 23 असुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवणेत आलेले आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल तात्काळ मिळणेकामी त्यांचे रॅपीड अँन्टीजन टेस्ट करणेत येणार आहेत.
          तसेच त्यांच्या कमी संपर्कात असलेल्या ( low risk contacts ) व्यक्तींची संख्या 305 आहे. त्यांना घरातच विलगीकरण कक्षात राहणेचे सुचना प्रशासनाकडुन देण्याचे कामकाज चालु आहे.
         आरोग्य विभागामार्फत पुढील कामकाज सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ...
उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

Pages