मंगळवेढा ब्रेकिंग :-मंगळवेढा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित रूग्ण ;कोरोना बाधित संख्या 96 वर .... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, July 27, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग :-मंगळवेढा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित रूग्ण ;कोरोना बाधित संख्या 96 वर ....दिव्य न्युज नेटवर्क
          मंगळवेढा तालुक्यातील व ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांनाची सख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवेढा तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवसात 10 रुग्ण आढळून आले असून. मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांन संख्या वारंवार वाढत असून.
       वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज दि.27 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 69 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेण्यात आलेले होते या व्यक्तींमध्ये देगांव,कचरेवाडी आणि चोखामेळानगर या गावातील नागरीकांचा समावेश होता. तसेच आज दि.27 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 66 रॅपीड अँन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. त्या 66 रॅपीड अँन्टीजन टेस्ट पैकी 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
        सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT - PCR ) चे 10 अहवाल प्राप्त झाले असुन सलगर -3 , बोरोळे -4 आणि मरवडे -3 असे एकुण 10 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे.

मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 96 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.15 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे.तरी आज पर्यंत 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
            वरील स्वब घेतलेल्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू करणेत आलेले आहे.
           तसेच आज मुढवी , बावची,कात्राळ,हि गावे आणि मंगळवेढा (शिक्षक कॉलनी) मंगळवेढा (प्रथम वर्ग 1 चे दंडाधिकारी यांचे न्यायालय आणि परीसर ) , मंगळवेढा ( मेटकरी वस्ती ) , मंगळवेढा ( मुलाणी गल्ली ) हा मंगळवेढा शहरा मधील भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला असून .वैदयकीय विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करणेत आलेल्या असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

Pages