२० जवानांना श्रद्धांजली अर्पण : चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याचे आवाहन... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, June 20, 2020

२० जवानांना श्रद्धांजली अर्पण : चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याचे आवाहन...



ब्रह्मपुरीत चीनचा झेंडा जाळला...

मंगळवेढा /प्रतिनिधी
           भारतीय सीमेवरील चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झालेल्या शहीद जवानांना ब्रह्मपुरी( ता मंगळवेढा) येथील  ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळी आदरांजली अर्पण केली तसेच या हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन चीनचा लाल झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिंनपिंग  याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला ग्रामस्थांनी भारत माता की जय  अशा घोषणा दिल्या
   
  गावात या हल्ल्याचा निषेध म्हणून चीनची  मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्या बाजारातील चायना वस्तू न घेण्याचे आवाहन उद्योगपती महावीर पाटील यांच्या वतीने यावेळी करण्यात आले आगामी काही दिवसात चिनी वस्तू जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे मंगळवेढा तालुक्यातील व्यापाऱ्यांनी भारतात निर्मित करण्यात आलेल्या वस्तू विक्री करण्याचे आवाहन उद्योगपती महावीर पाटील यांनी केले आहे यावेळी विकास पुजारी, अनमोल देशमुखे, रणजित पाटील, पोलीस पाटील प्रशांत पाटील,सरपंच मनोज पुजारी किशोर देशमुखे,  भैया देशमुखे,   प्रवीण पाटील, यशवंत शेटे उमेश जगदाळे,  अमित देशमुखे, दादासो मोरे, शुभम पाटील, सुरज गोसावी, अभय देशमुखे,  नानासाहेब पुजारी, भारत चौगुले, सुनील चव्हाण, राजेंद्र पुजारी, गणेश देशमुखे, अब्दुल सुतार , अभिषेक पुजारी, याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
         ब्रह्मपुरी ग्रामस्थांनी  क्रांती चौकात एकत्रित येऊन  शहीद झालेल्या भारतीय जवानांना  श्रद्धांजली वाहण्यात आली  निषेध म्हणून चीनचा झेंडा जाळण्यात आला याप्रसंगी उद्योगपती महावीर पाटील, विकास पुजारी, अनमोल देशमुखे, प्रशांत पाटील, रणजित पाटील आदी

Pages