नर्सवर अत्याचार करणार्‍या डॉक्टरला न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलिस कोठडी... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, June 19, 2020

नर्सवर अत्याचार करणार्‍या डॉक्टरला न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलिस कोठडी...दिव्य न्यूज नेटवर्क
             माझे तुइयावर प्रेम असून तुला आयुष्यभर संभाळेन असे आमिष दाखवून एका 27 वर्षीय नर्सवर दवाखान्यातच अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी  पोलिसांनी समर्थ हॉस्पीटलचे डॉ.प्रशांत प्रभाकर नकाते यांना अटक करून मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश  जी.एम.चरणकर यांच्यासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
         
 या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी तथा 27 वर्षीय पिडीत महिला ही समर्थ हॉस्पीटलमध्ये दोन वर्षापासून नर्स म्हणून काम करीत होती.आरोपी तथा डॉ. प्रशांत नकाते यांनी दवाखान्यात कोणी नसताना तू मला खूप आवडतेस मी तुइयावर प्रेम करतो,तुला आयुष्यभर संभाळेन असे आमिष दाखवून आरोपीने  5 जून 2019 ते 26 एप्रिल 2020 या दरम्यान  तीच्याशी शारिरिक संबंध ठेवले. तदनंतर शारिरिक संबंध ठेवल्याने पिडीतेस दिवस गेले होते.
          आरोपीने जबरदस्तीने गोळया देवून गर्भपात केला. कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.दि. 18 जून रोजी सकाळी 11.00 वा. पिडीत नर्सने त्रासाला कंटाळून समर्थ हॉस्पीटलच्या समोर बाटलीत घेवून आलेले पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. यामध्ये पिडीता जखमी झाली होती.         
              उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तपासिक अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अमोल बामणे यांनी आरोपीस अटक करून शुक्रवारी मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता दि. 22 जूनपर्यत पोलिस कोठडी सुनावली.

Pages