सोलापूर मध्ये आज 31 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित 308 ;कोरोनाने घेतला 21 वा बळी .. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 13, 2020

सोलापूर मध्ये आज 31 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित 308 ;कोरोनाने घेतला 21 वा बळी ..
प्रतिनिधी / सोलापुर  
          सोलापुरात  बुधवारी नव्याने 31 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे.  कोरोनाने दोघांचा बळी घेतला असून आतापर्यंत 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 308  वर पोहचली आहे. आज 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यामध्ये 8 पुरुष,  4 स्त्रीचा समावेश आहे . उर्वरित  203 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी दिली. 
         
मयत झालेली व्यक्ती गुरूनानक नगर परिसरातील 60   वर्षाचे पुरुष असून 11 मे रोजी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 11 मे रोजी उपचारा दरम्यान  त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरी व्यक्ती इंदिरा वसाहत भवानी पेठ  मोदी परिसरातील 72 वर्षांचे पुरुष  असून  सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  त्याचा उपचारादरम्यान  मृत्यू झाले. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . आज एकूण 129 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 98 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
           आज आढळलेल्या  रुग्णांपैकी साईबाबा चौक ६,सदर बाजार लष्कर २, शास्त्री नगर ४, नवनाथ नगर १,भारतरत्न इंदिरा नगर ७, रामलिंग नगर 1, कुमार स्वामी नगर १, बेगम पेठ १, केशव नगर 1, गवळी वस्ती आकाशवाणी १, जुळे सोलापूर १, एकता नगर -१, इंदिरा वसाहत भवानी पेठ १,पोलिस मुख्यालय सोलापूर 1, रंगभवन परिसर 1, रविवार पेठ -१ हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.   तर आज 12 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 84  जणांना घरी सोडण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 308  मध्ये 173 पुरूष तर 135 महिला आहेत. मृतांची संख्या 21 झाली आहे.  203 व्यक्ती उपचार घेत आहेत. 


सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती ....
होम क्वरटाईनमध्ये : 3429
एकूण अहवाल प्राप्त : 3360
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 3052
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 308
अहवाल प्रलंबित : 142
बरे होऊन घरी गेले : 84
मृत- 21

Pages