Breaking : सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, April 12, 2020

Breaking : सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी..


    11 एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे

सोलापूर/प्रतिनिधी
           आज रविवारी दुपारपासून जोडबसवण्णा चौकातील एका परिसरात एका किराणा दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हे पहिली घटना असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
         
  सदर किराणा दुकानदार कोणा कोणाच्या संपर्कात आला होता याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. येथील संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाने जीवाची बाजी लावून कोरोना विषाणूला वेशीवर थोपवले होते. जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक ,आरोग्य अधिकारी जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्या सह सर्वजण या लढ्यात सोलापूरकरांच्या सोबत झटत आहेत.
           सोलापुरात पाच्छा पेठ परिसरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.हा रुग्ण दहा तारखे दाखल झाला होता. काल पहाटे म्हणजे दिनांक 11 रोजी तो मरण पावला. आज दुपारी 3.30 वाजता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे.सदर रुग्णाचे वय 56 आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर आता सील करणं सुरू केल असून आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबियांची माहिती घेणं सुरू झालं आहे.

Pages