धक्कादायक; सोलापुरात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 16, 2020

धक्कादायक; सोलापुरात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले...जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : नऊ जण महिलेच्या संपर्कातील,एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील

सोलापूर/प्रतिनिधी
           सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.  एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे.  हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे.
       
तेलंगी पाच्छा पेठेतील एका किराणा दुकानदाराचा कोराेनामुळे मृत्यू झाला होता. या दुकानाच्या संपर्कातील १४८ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यात एका महिलेला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचे रिपोर्ट गुरुवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. यात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.ही महिला पूर्व भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका व्यक्तीला काेरोनाची लागण झाली आहे.  सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.

Pages