शेतकर्‍यांनी मत्स्य शेतीकडे वळावे :- आनंद (बाळु)ताड - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 6, 2020

शेतकर्‍यांनी मत्स्य शेतीकडे वळावे :- आनंद (बाळु)ताडमंगळवेढा/प्रतिनिधी 


              मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग हा पहिलाच वारंवार पाण्यावाचून होरपळलेला भाग म्हणुन ओळखला जातो या भागात शेतकरी काबाडकष्ट करून मेटाकुटीला आलेला दिसून ऐतो अशाच ऐका ग्रामीण भागातील ज्यांनी आपल्या गरीब परिस्थिती वर मात करत उद्योजका पर्यंत मजल मारली असे पाटखळचे सुपुत्र आंनद(बाळु) ताड यांनी येणाऱ्या नविन पिडी समोर ऐक आदर्श निर्माण केला आहे 
       
दुष्काळी भागात पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिके जळून जात असल्यामुळे  शेतकर्‍यांनी आता मत्स्य शेती करणे काळाची गरज असल्याचे मत उद्योजक आनंद(बाळु) ताड यांनी व्यक्‍त केले.ते लक्ष्य मंगल अँग्रो फार्म यांनी पाठखळ जत रोडलगत युटोपियन शुगर समोर पाटखळ येथे ताड यांच्या शेतात मत्स्य शेती प्रकल्पाच्या उद्घाटन केले त्या प्रसंगी बोलत होते.
            याप्रसंगी लक्ष्य मंगल अँग्रो फार्म महाराष्ट्रचे सहाय्यक अभियंता के.के.शिंदे, तज्ञ नेपाळचे ऐजाज अन्सारी,अभियंता राज पाटील,भारत ताड, सदाशिव माने,बिरुदेव कोळेकर, प्रवीण लेंडवे,दिनेश चव्हाण,नारायण गायकवाड, राहुल बुरुटे मनोज गंडे आदीजन उपस्थित होते.
          आंनद (बाळु) ताड पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित असून येथील शेतकर्‍यांनी व बेरोजगार युवकांनी बंदीस्त मत्स्य शेती केल्यास इतर पिकांच्या दुप्पट उत्पन्‍न घेता येईल व आर्थिक उन्‍नती साधता येईल, असेही ते म्हणाले. येथे उत्पादीत होणार्‍या गोड्या पाण्यातील  माशांना देश-विदेशात मोठ्या प्रमात मागणी असून केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून या उद्योगाला उभारी देण्यासाठी विविध योजना  राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.      
            "मत्स्य शेतीस शासनाचे ६० टक्के अनुदान"
               
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील आनंद(बाळु)ताड यांच्या शेतात बायोफ्लॉक फिश फार्मिंग योजनेतून बंदीस्त मत्स्य पालनाचा पहिला प्रकल्प राबवण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये देशी चिलापी, सिंधी,पाब्दा व देशी केवई या जातीच्या माशांचे संवर्धन करण्यात आले असून सदर योजनेसाठी शासनाकडून ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे.


Pages