सध्याच्या काळात प्रत्येक आईला शिवबासारखे लेक हवा आहे मग आईने जिजाऊ सारखे का व्हायला नको :- प्राध्यापिका प्रतिभा मोरे - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, February 23, 2020

सध्याच्या काळात प्रत्येक आईला शिवबासारखे लेक हवा आहे मग आईने जिजाऊ सारखे का व्हायला नको :- प्राध्यापिका प्रतिभा मोरे


मंगळवेढा/प्रतिनिधी
           तालुक्यातील पाटकळ येथेल शिवप्रेमी तरुण मंडळ सार्वजनिक शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत जगण्याची भान आणि समाज्याचे जान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा अरुणा माळी, जिल्हा परिषद सदस्य मंजुळा कोळेकर,शोभा मोरे,राणी लुगडे,सुवर्णा जाधव,पत्रकार दत्तात्रेय नवत्रे संभाजी नागणे,बीराप्पा करे,पोपट इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापिका मोरे म्हणाल्या की सध्याच्या काळात आपण ज्या क्षेत्रात काम करत आहेत या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.त्यामुळे यशप्राप्ती निश्चित होते.
             
पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लक्ष द्यावे. महिलांवर अन्याय होत असल्याने स्त्रीचा आदर करण्यास शिकून तिला प्रोत्साहित केल्यास ति देखील चांगले कर्तृत्व देखील सिद्ध करू शकते व नुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते  त्यासाठी छत्रपतींचे विचार मनावर बिंबवावे लागतात असे प्रतिपादन प्राध्यापिका मोरे यांनी व्यक्त केले आहे.
              नगराध्यक्षा अरुणा माळी म्हणाल्या की सध्याच्या काळातील महिलावरील अन्याय अत्याचारावर नियंत्रणासाठी शिवबाची शिकवण ही एकमेव मात्रा असून त्यासाठी शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज असून ज्यांनी विजेसारखी तलवार चालवुन गेला,निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असे राजे छत्रपती होऊन गेले व याचे विचार आत्मसात करण्याचे प्रयत्न समाजात होणे गरजेचे आहे.

Pages